प्रेमाला कोणतेही बंधन नसते इतकेच नव्हे, तर कोणतीही सीमा आणि मर्यादा नसते. जेव्हा प्रेम होते, ते फक्त घडते. आतापर्यंत तुम्ही प्रेमात जाती-पातीचे बंधने पाहिली असतील. गेल्या काही काळापासून समलिंगी विवाहही होऊ लागले आहेत; पण आपण ज्या स्त्रीबद्दल बोलत आहोत तिचे प्रेम याही पुढच्या टोकाचे आहे, कारण तिचे प्रेम कोणत्याही माणसाची नसून एका आत्म्याशी जुळले आहे आणि लवकरच ते लग्न करणार आहे. ब्रिटनमधील आॅक्सफर्डशायर येथे राहणारी ब्रोकार्डे म्हणते की, ती एका आत्म्याच्या प्रेमात आहे आणि तिच्या जोडीदाराने तिला हिºयाची अंगठी देऊन प्रपोज केले आहे. दोघेही लवकरच लग्न करणार आहेत.
ब्रोकार्डे प्रसिद्धीच्या झोतात आली जेव्हा तिने उघड केले की, तिचे एका सोलमेटवर प्रेम आहे. तिच्या मृत प्रियकराचा आत्मा तिला भेटायला येतो. तिचा प्रेमी दुसरा कोणी नसून, एडवर्डो नावाचा व्हिक्टोरियन सैनिक आहे. एडवर्डो हा ब्रोकार्डेच्या घरी आला आणि तिथे ब्रोकार्डेच्या प्रेमात पडला. आता ते दोघेही लग्न करणार आहेत.
ब्रोकार्डेने या लग्नाच्या प्रस्तावाची कहाणी शेअर केली. तिने सांगितले की, एडवर्डोच्या आत्म्याने तिच्या उशाजवळ हिºयाची अंगठी ठेवली. यानंतर ब्रोकार्डे हिने ती अंगठी घालून होकार दिला. एडवर्डोबद्दल बोलताना ब्रोकार्डे म्हणाले की, त्यांचे वय ३५ वर्षे आहे. अपघातात त्यांचा मृत्यू झाला; पण ब्रोकार्डे हिला पाहून त्यांचा आत्मा प्रेमात पडला आणि दोघेही एक वर्षापासून रिलेशनशीपमध्ये आहेत.
ब्रोकार्डेने सांगितले की, एडवर्डो हा अतिशय लाजाळू आणि राखीव भूत आहे. ब्रोकार्डे हिने प्रसारमाध्यमांसमोर आपले प्रेम व्यक्त केले, तेव्हा ती संतापली. त्यांची प्रेमकहाणी समोर यावी असे तिला वाटत नव्हते. ही बातमी मीडियात आल्यानंतर बराच काळ एडवर्डोने ब्रोकार्डेला भेटण्यास नकार दिला. ती एडवर्डोला फोन करायची; पण त्याने यायला नकार दिला. मात्र, बरीच माफी मागितल्यानंतर त्याने पुन्हा नाते जपण्यास होकार दिला. आता दोघेही लग्नानंतर एकत्र राहण्याचा विचार करत आहेत.