मानौस (ब्राझिल) – भारतीय महिला फुटबॉल टीमला ब्राझीलसारख्या धुरंधर टीमने चार देशांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात शुक्रवारी ६-१ ने पराभूत केले. विश्व चषक २००७ चा उपविजेता ठरलेल्या ब्राझीलसाठी डेबोरा ओलिव्हियराने पहिल्याच मिनिटाला गोल केला. भारताची मनीषा कल्याण हिने आठव्या मिनिटात बरोबरीचा गोल साधला. जियोव्हाना कोस्टाने ३६ व्या मिनिटाला ब्राझीलला पुन्हा आघाडी दिली. दुसऱ्या सत्रात ब्राझिलने चार आणखी गोल मिळविले. ब्राझीलकरिता एरियाडिना बोर्गेस (८१ व्या मिनिटाला ५२ वा गोल), कॅ रोलिन फेराज (५४ वा गोल) आणि गॅसे फेरेइरा (७६ वा गोल) यांनी गोल केले. या सामन्याबरोबरच ब्राझील महिला फुटबॉल टीमची मिडफील्डर फोरमिगा हिने ४३ वर्षांच्या वयातच फुटबॉलला अलविदा केले. फोरमिगा हिने सात ऑलिम्पिक आणि सात विश्व चषक खेळले आहेत. जागतिक क्रमवारीमध्ये सातव्या स्थानावर असलेल्या ब्राझील आणि ५७ व्या क्रमांकावरील भारतीय टीम यांच्यातील हा मुकाबला तसा विसंगतच होता. ब्राझीलने चेंडूवर ७० टक्के नियंत्रण कायम राखले. भारताकरिता मनीषाने केलेला गोल आणि गोलकीपर अदिति चौहानची कामगिरी लाभदायक ठरली.
भारताचे मुख्य प्रशिक्षक थॉमस डोनेर्बी यांनी मनीषाने केलेल्या गोलची प्रशंसा करताना म्हटले की हा सवार्ेच्च स्तरावरील गोल होता.या गोलामुळे सुरुवातीला टीमला आत्मविश्वास मिळाला आणि आम्हाला पुनरागमनाची संधीही मिळाली असे डोनेर्बी यांनी नमूद के ले. ब्राझीलकडून पराभूत होण्यामध्ये काहीच लज्जास्पद नाही असेही त्यांनी स्पष्ट के ले. आम्हाला सोबत सकारात्मक बाबीच घेऊन जायचे असल्याचे ते म्हणाले. टीमसाठी हा चांगला धडा असल्याचे नमूद करून तो पुढील सामन्यांमध्ये कामाला येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताला २९ नोव्हेंबरला चिलीसोबत तर २ डिसेंबरला व्हेनेझुएलासोबत खेळावयाचे आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …
2 comments
Pingback: kingdom66คาสิโน
Pingback: Research