मुंबई – आगामी एएफसी आशियाई महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या संघाला स्टर्लिंग सिल्व्हर (चांदी)च्या हॉलमार्कची ५.५ किलोची चमकदार ट्रॉफी प्रदान के ली जाणार आहे. ही स्पर्धा २० जानेवारीपासून पुणे, मुंबई आणि नवी मुंबईत खेळवली जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने स्पर्धेसाठी विशेष सूट देखील दिली आहे. येथे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार ही ट्रॉफी लंडनच्या जगप्रसिद्ध सिल्व्हरस्मिथ थॉमस लिटे यांनी बनवली आहे. ट्रॉफी आधुनिक डिझाइनची असून, त्यामध्ये असे काही घटक आहेत की जे स्पर्धेच्या दीर्घकालीन इतिहासाचा सन्मान करतात. या ट्रॉफीचे हँडल सहा मजबूत चांदीच्या छड्यांनी बनविलेले आहे. या छड्या १९७५ मधील पहिल्या स्पर्धेमध्ये खेळलेल्या सहा सहभागी संघांचे प्रतिक आहेत.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …