महिला क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर

भारत-पाकिस्तानमध्ये महामुकाबला होणार
मुंबई/नवी दिल्ली – भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील प्रत्येक क्रिकेट सामन्याची फॅ न्सना मोठी उत्सुकता असते. त्यात वर्ल्ड कप स्पर्धेतील सामना असेल तर तो नेहमीच जगभरात मोठ्या संख्येने पाहिला जातो. आयसीसीने पुढील वर्षी होणाऱ्या महिला क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये या दोन टीम एकमेकांसमोर येणार आहेत. महिला क्रिकेट वर्ल्ड कपला ४ मार्चपासून न्यूझीलंडमध्ये सुरुवात होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्याने या स्पर्धेची सुरुवात होईल. दोन्ही देशांमधील ही लढत ६ मार्च रोजी हेमिल्टनमध्ये होणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये एकूण ३१ सामने होणार असून ३१ दिवस ही स्पर्धा चालेल. या स्पर्धेत ८ टीम उतरणार आहेत. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि भारत या टीम्सनी या स्पर्धेत त्यांच्या कामगिरीच्या जोरावर थेट प्रवेश केला आहे, तर न्यूझीलंडची टीम यजमान असल्याने आपोआप पात्र ठरली. नुकत्याच झालेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय पुरुष टीमचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्धच होता. महिला क्रिकेट वर्ल्ड कप यंदा लीग फॉरमॅटमध्ये खेळली जाणार आहे. यानुसार सर्व ८ टीम्स एकमेकांविरोधात खेळतील. लीगमध्ये टॉप ४ ठरलेल्या टीम्स सेमी फायनलसाठी पात्र होतील. वर्ल्ड कपमधील पहिली उपांत्य फेरी ३० मार्च रोजी वेलिंग्टनमध्ये होईल, तर ३१ मार्च रोजी दुसरी उपांत्य फेरी हेग्ले ओव्हलमध्ये होणार आहे. ३ एप्रिल रोजी अंतिम लढत होईल. उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी या दोन्हींसाठी एक दिवस अतिरिक्त राखून ठेवण्यात आला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …