महाराष्ट्रात १० कोटी कोरोना लसीकरणाचा टप्पा पूर्ण

मुंबई – महाराष्ट्राच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाने चांगलीच गती घेतली असून, आतापर्यंत १० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे. देशातील लसीकरणाची स्थिती लक्षात घेता हा एक विक्रम मानला जात आहे. उत्तर प्रदेशनंतर १० कोटींचे लक्ष्य गाठणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य ठरले आहे, तर मुंबईत सर्वाधिक लसीकरण झाले आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ६ कोटी ८० लाख ५३ हजार ७७ नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर ३ कोटी २० लाख ७४ हजार ५०४ नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. मुंबईत सर्वाधिक १ कोटी ४९ लाख ९२ हजार ८२५ डोस, तर पुण्यात १ कोटी २२ लाख ३३ हजार ३४० डोस दिले गेले. त्या खालोखाल ठाणे (८४ लाख ३७ हजार ८२५), नाशिक (४८ लाख ७६ हजार ९४८), नागपूर (४५ लाख ५४ हजार २६४) चा क्रमांक लागतो.
राज्यात मंगळवारी ९८२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर राज्यात १२९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत ६४ लाख ६१ हजार ९५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा कोरोनामुक्ती दर ९७.६२ टक्क्यांवर गेला आहे. राज्यात मंगळवारी २७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे. राज्यात सध्या १३ हजार ३११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपवण्यात मुंबई महानगरपालिकेला मोठे यश आले आहे. मुंबईतील रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट पाहायला मिळत आहे. मुंबईत मंगळवारी तीनशेहून कमी रुग्णांची नोंद झाली, तर मुंबईचा कोरोनामुक्ती दर ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे, तर मंगळवारी केवळ एकाच व्यक्तीने कोरोनामुळे जीव गमवला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …