महाराष्ट्रात गेल्या ५ महिन्यांत तब्बल १०७६ शेतकºयांनी संपवले आयुष्य

मुंबई – विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. शुक्रवारी अधिवेशनाचा तिसरा दिवस होतो. हिवाळी अधिवेशन २८ डिसेंबर २०२१ रोजी संपणार आहे. दरम्यान, अधिवेशनात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शेतकरी आत्महत्यांविषयी माहिती दिली आहे. राज्यात जून ते आॅक्टोबर २०२१ या कालावधीत एकूण १०७६ शेतकºयांनी आत्महत्या केली असल्याचे ते म्हणाले.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, या आत्महत्यांपैकी ४९१ प्रकरणे ही जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरवली आहेत. यासोबतच त्यांना आर्थिक मदतही दिली असल्याची माहिती दिली. राज्यातील शेतकºयांना कर्जमाफी देण्यात आली होती, मात्र नापिकी, नैसर्गिक आपत्ती आणि इतर कारणांमुळे शेतकºयांनी आत्महत्या केल्या, तसेच आर्थिक सहाय्य आणि आत्महत्या रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर वडेट्टीवारांनी उत्तर दिले आहे.

शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना वडेट्टीवार म्हणाले की, ‘जून ते आॅक्टोबर २०२१ या कालावधीत १०७६ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्यांमधून जिल्हास्तरीय समितीने ४९१ पात्र ठरवल्या आहेत. २१३ अपात्र ठरवल्या आहेत, तर ३७२ प्रकरणे ही चौकशीसाठी प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. पात्र असलेल्या ४९१ पैकी ४८२ जणांना मदतदेखील देण्यात आल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …