महाराष्ट्राचे किशोर-किशोरी खो-खो संघ जाहीर

मुंबई – किशोर-किशोरी गटाची ३१ वी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा उना (हिमाचल प्रदेश) येथे २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान होणार आहे. यासाठी महाराष्ट्राचे किशोर व किशोरी खो-खो संघ महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सरचिटणीस गोविंद शर्मा यांनी जाहीर केले.

गेले दीड दोन वर्षात खरेतर खेळाडू मैदानात नव्हते. त्यात या खेळाडूंचा वयोगट १४ वर्षांखालील असल्याने सर्वच संघांना या वयोगटातील खेळाडूंना तयार करणे हे एक प्रकारचे आव्हानच होते. या मैदानी निवड चाचणीसाठी महाराष्ट्रातून ५२ मुले व ४६ मुली उपस्थित होत्या. त्यामुळे निवडक खेळाडूंमधून महाराष्ट्राच्या खेळाडूंची निवड करताना निवड समिती सदस्य अजित शिंदे (सोलापूर), हरिष पाटील (नंदुरबार), आनंद पवार (धुळे) व माधवी चव्हाण-भोसले (सातारा) यांना तारेवरची कसरत करावी लागली असल्याचे सांगितले. या संघ निवडीवेळी भारतीय खो-खो महासंघाचे सह सचिव डॉ. चंद्रजीत जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, सचिव ॲड. गोविंद शर्मा, खजिनदार ॲड. अरुण देशमुख, आयोजक कमलाकर कोळी व इतर मान्यवर उपस्थित होते. कोविड-१९ मुळे संपूर्ण देशभर जी परिस्थिती होती त्यापेक्षा महाराष्ट्रात निर्बंध अधिक होते, असेही काही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्याचा फटका संघ निवड करताना होत असल्याचेही सांगितले. रविवारी (दि. १४ नोव्हेंबर) युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ठाणे येथे मैदान निवड चाचणीतून निवडलेले दोन्ही संघ जाहीर केले.
किशोर : जिशन मुलाणी, मोहन चव्हाण (सोलापूर), आशिष गौतम (ठाणे), तौफिक तांबोळी (पुणे), ईशांत वाघ (अहमदनगर), अथर्व पाटील (सांगली), सोत्या वळवी, राज जाधव, जितेंद्र वसावे, हाराद्या वसावे (उस्मानाबाद), सागर सुनार (मुंबई उपनगर), नीरज खुडे

(सातारा), राखीव : गोविंद पाडेकर (नाशिक), आकाश खरात
(सांगली), रोहन सूर्यवंशी (धुळे). प्रशिक्षक : प्रफुल्ल हाटवटे (बीड), व्यवस्थापक : मंदार परब, फिजिओ : डॉ. किरण वाघ (अहमदनगर).

किशोरी : सुषमा चौधरी, साई पवार (नाशिक), प्राजक्ता बनसोडे (सोलापूर), धनश्री कंक, दीक्षा साठे (ठाणे), सायली कार्लेकर (रत्नागिरी), अंकिता देवकर, धनश्री करे (पुणे), समृद्धी पाटील, सानिका चाफे (सांगली), संचीता गायकवाड (सातारा), प्राजक्ता औशिकर (धुळे). राखीव : कौशल्या कहाडोळे (नाशिक), साक्षी व्हनमाने (सोलापूर), किंजल भिकुले (मुंबई). प्रशिक्षक : एजाज शेख (मुंबई). व्यवस्थापक : प्रियांका चव्हाण (ठाणे).

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …