महाटीईटी परीक्षा ठरलेल्या तारखेलाच होणार

 

पुणे- महाराष्ट्रराज्य परीक्षा परिषदेच्यावतीने येत्या रविवारी २१ नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. परीक्षेची तायरी करण्यात आली असून 1443 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. आरोग्य विभागाची गट क आणि गट ड परीक्षा, देगलूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक यामुळं परीक्षा वारंवार लांबणीवर टाकण्यात आली होती. तर, २१ नोव्हेंबरला नेट परीक्षा असल्यानेयावेळी देखील परीक्षा लांबणीवर पडणार का असा प्रश्न निर्माण झाल होता, मात्र परीक्षा परिषदेनं टीईटी परीक्षा तारखेलाचं होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. टीईटी परीक्षेसाठी काही विद्यार्थी पेपर क्रमांक १ आणि पेपर क्रमांक २ या दोन्हीसाठी अर्जकरतात. तर, काही विद्यार्थीएकाच पेपरला अर्ज करतात. दोन्ही पेपरसाठी १ लाख ३८ हजार ४७ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची यंत्रणा सज्ज झालेली आहे. परीक्षेच्या आयोजनासाठी १४४३ परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आलेली आहेत. तर, विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगीनमध्ये प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
आता टीईटी परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार हे स्पष्ट झालेलं आहे. यासाठीची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. दरम्यान, याच दिवशी युजीसीच्या नॅशनल टेस्टींग एजन्सीमार्फत सहायक प्राध्यापक भरतीसाठी घेण्यात येणारी नेट म्हणजे राष्ट्रीय पात्रता परीक्षा होणार आहे. नॅशनल टेस्टींग एजन्सीने(एनटीए) नेटचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. २० ते३० नोव्हेंबर व १ ते ५ डिसेंबरदरम्यान ऑनलाईन विषयनिहाय ही परीक्षा होणार आहे. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यानेकाही विद्यार्थ्यांना कोणत्या तरी एका परीक्षेची निवड करावी लागणार आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …