ठळक बातम्या

मविआ शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला

मुंबई – राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी (मविआ)च्या शिष्टमंडळाने रविवारी सायंकाळी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. याबाबत त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मविआ शिष्टमंडळाकडून राज्यपालांना निवेदन देण्यात आले. यावेळी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (काँग्रेस) व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (शिवसेना) उपस्थित होते.
छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात आणि एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींशी अर्धा तास चर्चा केली. राज्यपालांनी सरकारच्या प्रस्तावावर चर्चा करून सोमवारी निर्णय कळवणार असल्याचे सांगितल्याचा दावा या नेत्यांनी केला. राज्यपाल सकारात्मक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची रविवारी भेट घेऊन त्यांना विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीचा कार्यक्रम सादर केला. त्यावर कायदेशीर बाबी तपासून सोमवारी सांगतो, असे आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे राज्यपाल आता काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्य सरकारने विधानसभा अध्यक्ष पदाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार २७ डिसेंबर रोजी अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करायचा आहे, तर २८ डिसेंबर रोजी नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी थोरात, भुजबळ आणि शिंदे राजभवनावर गेले होते. या भेटीनंतर एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब थोरात यांनी मीडियाशी संवाद साधून चर्चेची माहिती दिली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …