ठळक बातम्या

मविआच्या तिन्ही पक्षांवरून जनतेचा विश्वास उडाला – प्रवीण दरेकर

मुंबई – राज्यातील विधान परिषदेच्या ६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने ४ जागा पटकावून राज्यात अव्वल स्थान निर्माण केले आहे. यावर बोलताना विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. ‘जनतेचा या सरकारवरील विश्वास उडाला आहे’, असेही त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने या निवडणुकीसाठी समझोता करून आपापल्या परीने उमेदवार दिले होते, परंतु ज्या पद्धतीने या निवडणुकीचा निकाल समोर आला, ते पाहता महाविकास आघाडीमध्येच मतभेद असल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर काँग्रेसनेही अचानक उमेदवार बदलल्याने काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूससुद्धा या निमित्ताने पुढे आलेली आहे. या सर्व घडामोडींवर बोलताना प्रवीण दरेकर यांनी आघाडी सरकारमध्ये ताळमेळ नसून, आता जनतेचा या सरकार विश्वास राहिलेला नाही, असेही सांगितले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …