मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – प्रवीण दरेकर

मुंबई – भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नवाब मलिक यांचे डोके ठिकाणावर नाही. त्यांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन उपचार करावेत, असा टोला लगावला आहे. ते पुढे म्हणाले, कुठल्याही प्रकारची कागदपत्रे सादर न करता, पुरावे सादर न करता केवळ आरोप करत राहणे, अशा प्रकारचे काम नवाब मलिक करत आहेत. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तींशी संबंध समोर आलेले आहेत. आता त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली.

बुधवारी नवाब मलिक यांनी हाजी अराफत शेख आणि मुन्ना यादव यांचे नाव घेतले. माझा त्यांना प्रश्न आहे की, हाच त्यांचा हायड्रोजन बॉम्ब होता का? काल (मंगळवारी) देवेंद्र फडणवीस यांनी जो स्फोट केला आहे, त्यातून ते अजूनही सावरलेले दिसत नाहीत, कारण त्यांचे १९९३ मधल्या आरोपी सोबतचे संबंध आता समोर आलेले आहेत, असे दरेकर म्हणाले. अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तींशी संबंध समोर आल्याने मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी यावेळी केली. नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप फुटकळ आहेत. मलिकांच्या आरोपाला कसलाही आधार नाही, असेही दरेकर म्हणाले.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …