मलिकांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी लाटल्या, सरकारी पाहुणे नक्की घरी जाणार – सोमय्यांचा दावा

मुंबई – मंत्री नवाब मलिकांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी लाटल्या आहेत. हा घोटाळा बाहेर आला म्हणूनच ते हात-पाय मारत आहेत. त्यांच्या घरी सरकारी पाहुणे नक्की जाणार, असा दावा शनिवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी करून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापवले आहे.

मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एक ट्विट केल्याने सध्या अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. आपल्या ट्विटमध्ये मलिकांनी सूचक भाष्य केले आहे. ते म्हणतात, साथियों, सुना हैं, मेरे घर आजकल में सरकारी मेहमान आनेवाले हैं, हम उनका स्वागत करते हैं. डरना मतलब रोज रोज मरना, हमे डरना नहीं, लड़ना हैं, गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, असे ट्विट मलिकांनी शनिवारी सकाळी केले होते. त्याचाच पाठपुरावा करत सोमय्यांनी मलिकांचा जोरदार समाचार घेतला. सोमय्या म्हणाले की, मंत्री नवाब मलिकांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी लाटल्या. हा घोटाळा बाहेर आला, म्हणूनच ते हात-पाय मारत आहेत. त्यांच्या घरी सरकारी पाहुणे नक्की जाणार. मलिक हे आता ट्विट करतात. कारण त्यांना भीती वाटत आहे. पुण्यात नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डात घोटाळा केला. ही जमीन नातेवाईकांच्या नावे केली. जमिनी लाटल्या आहेत. त्यामुळेच नवाब मलिक यांना भीती वाटत आहे. आता घोटाळेबाजांची चौकशी होणार आणि चोरीचा माल जप्त होणार. घोटाळा बाहेर आलाय म्हणून मलिक हात-पाय मारत आहेत. पैसे देऊन, प्रेशर करून घोटाळा लपत नाही. चोरी केली तर शिक्षा होणारच, असे ठाम मत सोमय्यांनी यावेळी व्यक्त केले. सगळ्यात महत्त्वाचे यावेळी सोमय्यांनी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्यावरही आरोप केले. ते म्हणाले, भावना गवळींनी ७ कोटींची चोरी झाल्याचे सांगितले, मात्र ते बोगस होते. याच बोगस आरोपाखाली उद्धव ठाकरेंनी ११ जणांना अटक केले, मात्र आता भावना गवळी यांनाही अनिल देशमुखांच्या शेजारी आर्थर रोडला खोलीची बुकिंग करावी लागणार आहे. भावना गवळींना ईडीचे तीन समन्स गेले आहेत. ईडीने त्या मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले आहे. त्यांना लवकरच हजर होण्याचे निर्देश न्यायालय देणार आहे. ठाकरे सरकार कोमात जायला निघाले आहे. ४ हजारांतले २ हजार यांच्या खिशात जात आहेत, असा दावा त्यांनी केला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …