मला माझ्या मुलीबद्दल जे वाटेल तेच मला आशीबद्दल वाटते – वैष्णवी

झी टीव्हीवरील नवीन मालिका मीतने प्रीमिअरपासूनच प्रेक्षकांच्या मनात आपले असे खास स्थान निर्माण केले आहे. ही प्रेरणादायी कथा आहे मीत हूडा आशी सिंगची. जी काम आणि जबाबदारी या बाबतीत समाजातील रूढींशी झगडत असलेल्या आपल्या देशातील अनेक महिलांचे प्रतिनिधित्व करते. या शोने प्रेक्षकांमध्ये या बाबतीत जागरूकता आणण्यास सुरुवात केली असून, मीत हूडाचे मीत अहलावत (शगुन पांडे) सोबत लग्न यांमुळे सगळे थक्क होतील. आशी आणि शगुन यांच्या केमिस्ट्रीची तर सर्वत्र चर्चा आहे. मात्र आशी सिंग आणि वैष्णवी मॅकडोनल्ड यांच्यातील नात्यानेही सगळेच चकित झाले आहेत.

वैष्णवी मॅकडोनल्ड आणि आशी सिंग एकमेकींना दीर्घ काळापासून ओळखतात कारण त्यांनी आधीही एकत्र काम केले आहे. पण मीतच्या सेटवर त्यांचे नाते आणखी दृढ झाले आहे. या शोमध्ये आई-मुलीच्या भूमिकेत त्या असल्याचे कळल्यापासून तर दोघीही खूप खूश आहेत. एकत्र आराम करणे असो किंवा खाणे असो किंवा रिल्स बनवणे आणि मीतसाठी बीटीएस व्हिडीओ पोस्ट करणे असो त्या दोघी सेटवर कायम एकत्र असतात.
आशीसोबतच्या आपल्या नात्याबद्दल वैष्णवी म्हणाल्या, मी या शोमध्ये आशीच्या आईची भूमिका निभावणार असल्याचे कळल्यापासूनच मी खूप आनंदात होते. आशी गोड, संवेदनशील आणि निरागस मुलगी आहे. मी तिच्यासोबत आधीही काम केले आहे. ती गोष्टी अगदी परिपक्वतेने हाताळते अगदी ती रागावली असली तरीही. ती कधीही आक्रमक प्रतिक्रिया देत नाही. लोकांना कसे हाताळायचे ते तिला कळते. हा तिचा गुण आहे. मी तिच्याहून बरीच मोठी आहे पण तरीही मी तिच्याकडून खूप काही शिकत आहे. एक अभिनेत्री म्हणून मोठे होताना मी तिला पाहिले आहे. तिच्यासोबत मी अगदी कम्फर्टेबल असते. आमच्या नात्याबद्दल नक्कीच काहीतरी आध्यात्मिक आहे. मला माझ्या मुलीबद्दल जे वाटेल तेच मला आशीबद्दल वाटते आणि ते निश्चितपणे गोड आहे आणि त्याचा आम्हाला आमच्या भूमिका साकारण्यासाठीही उपयोग होतो.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …