मला नव्या निर्मात्यांबरोबर काम करायला आवडते – आयुष्मान

आपला दमदार अंदाज आणि अभिनयाच्या जोरावर लाखो लोकांच्या हृदयात स्थान मिळवलेला अभिनेता आयुष्मान खुराना आपल्या चित्रपटांमुळे कायमच चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आयुष्मानने दिग्दर्शन क्षेत्रात डेब्यू करत असलेल्या लोकांबरोबर काम करण्याचा अनुभव शेअर करताना म्हटले की, मला नव्या निर्मात्यांबरोबर काम करणे पसंत आहे.
आयुष्मानने आपल्या मुलाखतीत खुलासा केला आहे की, त्याला नव्या दिग्दर्शकांबरोबर काम करणे पसंत आहे. कारण त्यांची जोखिम पत्करण्याची तयारी होती. माझ्या निम्म्याहून अधिक फिल्मोग्राफीतील चित्रपट नव्या निर्मात्यांसोबत आहेत व आगामी दोन चित्रपट डॉक्टर जी आणि ॲक्शन हिरो आहेत, ज्याद्वारे अनुभूती कश्यप आणि अनिरुद्ध गणपती दिग्दर्शनात डेब्यू करत आहेत. ते आपले जीवन आणि सिनेमाबद्दल खूप उत्साहित आहेत व मोठी जोखिम पत्करणारेही आहेत, असेही आयुष्मानचे म्हणणे आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …