मला तिन्ही प्रकारांत खेळायचंय – जोस बटलर


सिडनी – दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकने अपयशी कामगिरीमुळे तडकाफडकी कसोटीतून निवृत्ती घेतली, मात्र त्याच्या कृतीची पुनरावृत्ती करणार नाही. उलट मनासारखी खेळी होत नसली, तरी कसोटीतून माघार घेणार नाही. उलट तिन्ही प्रकारांत खेळण्याची इच्छा असल्याचे इंग्लंडचा यष्टिरक्षक जोस बटलरने स्पष्ट केले आहे. बटलरला ॲशेस मालिकेतील तीन सामन्यांत १९.२०च्या सरासरीने सहा डावात केवळ ९६ धावा करता आल्या आहेत,तसेच त्याने यष्ट्यांमागे झेलही सोडले आहेत. कुटुंबीय नेहमीच अडचणीत सोबत राहिले आहे. या काळातही त्यांचे समर्थन कायम आहे. त्यांनी मला घडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. त्यांचे मोल कदापिही विसरून चालणार नाही. त्यांच्याकडून मिळणारी प्रेरणा महत्त्वाची आहे आणि त्याच्या आधारावरच क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत खेळणार असल्याचे त्याने सांगितले.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …