ठळक बातम्या

मलाला युसूफझाई अडकली लग्नबंधनात

जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव

बर्मिंगहॅम – शांततेसाठी देण्यात येणारा नोबेल पुरस्कार प्राप्त मलाला युसूफझाई अखेर लग्नाच्या बेडीत अडकली आहे. मलालाने बर्मिंगहॅममध्ये एका छोट्या समारंभात निकाह केला. त्यानंतर आपल्या जोडीदारासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून तिने ही माहिती दिली. बर्मिंगहॅममध्ये माझ्या कुटुंबीयांच्या उपस्थितीमध्ये मी लग्न केले असून, भविष्यातील वाटचालीसाठी उत्सुक असल्याचे मलालाने म्हटले आहे. लग्नानंतर ट्विट करीत मलालाने ही माहिती दिली आहे. तिने आपल्या लग्न सोहळ्याचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत. हा दिवस माझ्यासाठी खास होता. मी लग्नबंधनात अडकले. बर्मिंगहॅममध्ये एका छोट्याशा कार्यक्रमात मी निकाह केला, यावेळी माझ्या कुटुंबीयांची उपस्थिती होती. भविष्यातील वाटचालीसाठी आम्ही उत्साही आहोत, आमच्या भावी आयुष्यासाठी तुमच्या प्रार्थनेची गरज असल्याचे ट्विट मलालाने केले आहे. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा पती असर, तिचे आई-वडील, झियाउद्दीन युसूफझाई आणि तूर पेकाई युसूफझाई दिसत आहेत. मलालाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हयरल झाले असून, जगभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मलाला युसूफझाईचा जन्म १२ जुलै, १९९७ रोजी झाला. ती एक पाकिस्तानी विद्यार्थिनी आहे. मलाला महिलांच्या शिक्षणासाठी चालवलेल्या चळवळीसाठी प्रसिद्ध आहे. तालिबानने पाकिस्तानच्या वायव्य भागात मुलींच्या शिक्षणावर बंदी घातली होती. या बंदीविरोधात मलालाने लढा दिला, तसेच या भागात महिलांच्या मानवी हक्कांची चाललेली पायमल्ली तिने जगासमोर आणली. मलालाच्या कार्याची दखल घेऊन तिला २०१४ मध्ये शांततेसाठी दिल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले. वयाच्या १७व्या वर्षी नोबेल पारितोषिक मिळवणारी मलाला ही आतापर्यंतची सर्वात तरुण नोबेल पारितोषिक विजेती आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …