वियना – अँडी मर्रेने एरेस्टे बँक ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात ह्युबर्ट हर्काचचा ६-४, ६-७ (६), ६-३ असा पराभव केला, जो मागील १४ महिन्यांत अव्वल १० खेळाडूविरुद्ध त्याचा पहिला विजय आहे. मर्रे दुसऱ्या सेटच्या टायब्रेकरमध्ये मॅच पॉइंट मिळवू शकला नाही, पण जागतिक माजी क्रमांक एकच्या खेळाडूने तिसऱ्या सेटमध्ये चांगला खेळ दाखवत २ तास ४० मिनिटांपर्यंत चाललेल्या सामन्यात विजय नोंदवला. ऑगस्ट २०२० मध्ये सिनसिनाटी मास्टर्समध्ये अलेक्झांद्र ज्वेरेवचा पराभव केल्यानंतर मर्रेने कोणत्याच अव्वल दहामधील खेळाडूविरुद्ध विजय मिळवला नव्हता. जागतिक क्रमांक दहाव्या क्रमांकावर काबिज हर्काचच्या या पराभवानंतर एटीपी फायनल्समध्ये जागा मिळवण्याच्या अपेक्षांना धक्का बसला. तिसरे मानांकन प्राप्त माटियो बेरेटिनीने ऑस्ट्रेलियाचा क्वालिफायर अलेक्सी पोपिरिनचा ७-६ (२), ६-३ असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. पहिल्या फेरीच्या इतर सामन्यांत ॲलेक्स डी मिनौरने २०१८ च्या चॅम्पियन केविन अँडरसनचा ६-३, ७-६ (३) असा, कार्लोस अल्कराजने डॅनियल इवान्सचा ६-४, ६-३ असा व निकोलोज बेसिलशविलीने पाब्लो कारेनो बुस्टाचा ७-५, ४-६, ६-३ असा पराभव केला.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …