मर्दानी-२च्या व्हिलनची आता टायगर-३ मध्ये वर्णी!

291021-MC-MU-MC-08

राणी मुखर्जीबरोबर मर्दानी-२ मध्ये खलनायक म्हणून उभा ठाकलेल्या विशाल जेठवाने आता एक मोठी झेप घेतली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार आता सलमान खान आणि कतरिना कैफ अभिनित टायगर-३ साठी विशालची वर्णी लागली आहे. मर्दानी-२ आणि टायगर-३ हे दोन्हीही यशराज बॅनरचे चित्रपट आहेत.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार मनीष शर्माच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या टायगर-३ मध्येही विशालची भूमिका जबरदस्त आणि खतरनाक आहे. तूर्तास त्याच्या भूमिकेबद्दल अन्य काही तपशील समोर आलेला नाही. विशाल जेठवाने मर्दानी-२ मध्ये एक नकारात्मक भूमिकेद्वारे आपले फिल्मी करिअर सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, कारण त्याला आपले अभिनय सामर्थ्य प्रेक्षकांसमोर सादर करायचे होते. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे कौतुकही झाले होते. त्यामुळेच प्रोडक्शन हाऊसने आपल्या आगामी चित्रपटासाठी विशालला कास्ट करण्याचा निर्णय घेतला असावा. कतरिना कैफ आणि सलमान खान यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट पुढील वर्षी ख्रिसमसला प्रदर्शित होईल, असा अंदाज आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …