मराठवाड्याला रेल्वेची नवीन वर्षाची गिफ्ट : नांदेड-हडपसर रेल्वेला सुरुवात

नांदेड – मराठवाड्यातून पुण्याला जाणाऱ्या (नांदेड, जालना, परभणी, औरंगाबाद) प्रवास्यांना रेल्वे विभागाकडून नवीन वर्षाचे गिफ्ट मिळाले आहे. मराठवाडा जनतेसाठी रविवारी आणखी एका रेल्वेसेवेला सुरुवात झाली. नवीन वर्षात नांदेड ते हडपसर या रेल्वेला केंद्रीय रेल्वेराज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यात या रेल्वेचा शुभारंभ केला. नांदेड ते हडपसर येथेजाण्यासाठी फर्स्टएसी, सकेंड एसी – १९०५ रुपये, थर्ड एसी- ८१० रुपये, स्लीपर कोच ३१५ रुपये, द्वितीय सीटिंग १३५ रुपये, थर्डइकोनॉमी- ७५० रुपये असे दर आकारण्यात येतील. त्यामुळे पुण्याला जाण्यासाठी प्रवाशांना ही रेल्वेसोयीस्कर ठरणार आहे.
पुणे-नांदेड- पुणे ही गाडी यापूर्वी परळीमार्गे सुरु होती. कोरोनाकाळात ती बंद करण्यात आली. नव्याने सुरु करण्यात आल्यानंतर तिला थेट मराठवाडा मार्गावरून चालवण्यात येत आहे. या मार्गावरील मनमाड येथून ही गाडी पुण्याकडे वळणार आहे. तसेच रेल्वेगाडीच्या डब्यांमध्येही बदल करण्यात आला आहे. सचखंड एक्सप्रेससासरखे एलएचबी डबे या विशेष गाडीला जोडण्यात आले आहेत. यामुले डिस्कब्रेक, सस्पेन्शन आदी बाबी तसेच अद्ययावत सुविधायुक्त हे डबे जोडले गेल्याने गाडीला गती मिळणार आहे. ही सुपरफास्ट एक्सप्रेस नांदेडवरून रात्री ८.३० वाजता सुटणार असून पुण्यात पहाटे पोहोचेल. तसेच नांदेडला जाण्यासाठीची रेल्वे-पुण्यावरून रात्री ११.३० वाजता निघणार, सकाळी 8.35 वाजता जालन्यात आणि पुढे ११.३० वाजता नांदेडमध्ये ही रेल्वे पोहोचेल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …