मराठमोळे मिसाईल मॅन अतुल राणेंची ‘ ब्रह्मोस’ एअरोस्पेसच्या प्रमुखपदी वर्णी

नवी दिल्ली – संरक्षण संशोधन व विकास संस्थे (डीआरडीओ)चे शास्त्रज्ञ अतुल राणे यांनी ब्रह्मोस एअरोस्पेस लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील एका व्यक्तीकडे महत्त्वाची जबाबदारी आली आहे. ब्रह्मोस एअरोस्पेस लिमिटेड ही कंपनी सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल बनवते. अतुल राणे हे मिशन क्रिटिकल ऑनबोर्ड कॉम्प्युटरचे स्वदेशी डिझाईन बनवणे आणि विकसित करणे, लूप सिम्युलेशन स्टडीजमध्ये हार्डवेअर, सिस्टीम ॲनालिसीस, मिशन सॉफ्टवेअरच्या विकास आणि डिफेन्स ॲप्लिकेशनच्या एव्हियोनिक्स तंत्रज्ञानामध्ये १९८७ पासून योगदान देत आहेत.
अतुल राणे यांनी चेन्नईच्या गिंडी इंजिनीअरिंग कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पुण्यातून पूर्ण केले. १९८७ मध्ये ते डीआरडीओमध्ये दाखल झाले. अतुल राणे यांनी त्यांची कारकीर्द डीआरडीओच्या प्रयोगशाळेतून केली होती. त्यानंतर त्यांनी भारतात विकसित होत असलेल्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या आकाश मिसाईल यंत्रणेतील मॉड्युलर रिअल टाईम सिम्युलेशन परीक्षण तंत्र विकसित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. नंतर त्यांनी ऑनबोर्ड कॉम्प्युटर डिव्हिजनमध्ये अग्नि-१ मिसाईल बवण्यासाठी नेमण्यात आलेल्या ऑनबोर्ड मिशन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोग्रामचे नेतृत्व केले.
अतुल राणे रशिया सोबतच्या ब्रह्मोस निर्मितीच्या पहिल्यापासून कार्यरत असणाऱ्या टीममध्ये कार्यरत आहेत. ब्रह्मोस टीमच्या सुरुवातीपासूनच्या कोअर टीमचे ते सदस्य आहेत. अतुल राणे हे मूळचे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील असून, रावेर तालुक्यातील सावदा हे त्यांचे मूळ गाव आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …