ममता बॅनर्जी फॅसिस्ट नाहीत, त्यांच्यावरील टीका अयोग्य – नवाब मलिक

मुंबई – आम्ही काही ‘सामना पेपर’ पाहिला नाही, पण सामनामध्ये ममता बॅनर्जी यांना फॅसिस्ट म्हणून लिहले जात असेल तर अशी टीका योग्य नाही. ममता बॅनर्जी या भाजपविरोधी आहेत. सामनामध्ये केलेल्या टिकेवर नवाब मलिक यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, मी कोणालाही घाबरत नाही. मी मरणालाही घाबरत नाही आणि जेलमध्ये जायलाही घाबरत नाही. कुणी सत्तेचा वापर करून जर तसे प्रयत्न करत असतील तर त्यांना आपण भीक घालत नाही, असेही मलिक म्हणाले आहेत.

सामनामध्ये ममता बॅनर्जी यांना फॅसिस्ट म्हणून टीका केल्यानंतर याविषयी राष्ट्रवादी प्रवक्ता नवाब मालिक यांना विचारले असता आम्ही सामना पाहिला नाही, असे खोचक विधान केले. मात्र त्यांना फॅसिस्ट म्हणून संबोधले केले असल्यास त्यांच्यावर केलेली ही टीका चुकीची असल्याच मत त्यांनी व्यक्त केले. ममता बॅनर्जी या भाजपविरोधी आहे त्यामुळे त्यांना फॅसिस्ट म्हणणे योग्य नाही. देशामध्ये काँग्रेसशिवाय विरोधी पक्ष निर्माण करणे शक्य नाही. यूपीएमध्ये वेगवेगळे जवळपास दीडशे घटक आहेत. त्या सर्वांना एकत्रित आणून एक प्रबळ विरोधी पक्ष निर्माण करण्याचा काम राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार करीत आहेत. महाराष्ट्रातही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांना एकत्रित आणून सत्ता स्थापन करण्याच काम शरद पवार यांनी केले होते. जे शक्य नव्हते ते शरद पवार यांनी करून दाखवले, त्यामुळेच येत्या काळातही सर्वांना एकत्रित आणून सर्वांच्या नेतृत्वात एक प्रबळ विरोधी पक्ष तयार करू, असेही नवाब मलिक म्हणाले आहेत. परिवहन महामंडळाच्या सध्या सुरू असलेल्या संपाबाबत आणि शासनाने त्यांच्यावर मेस्मा लावण्याची दिलेली धमकी या विषयी विचारले असता, नवाब मलिक यांनी सांगितले की, आत्तापर्यंत शासनाने आणि अनिल परब यांनी संयमाने आपली भूमिका मांडली. मात्र, या आंदोलनामध्ये भाजपचे दोन नेते शिरून या आंदोलनाला चुकीची दिशा देण्याचा प्रयत्न करीत होते. कोणतेही महामंडळ असेल त्याचे राज्य शासनामध्ये विलिगीकरण करणे सध्या तरी शक्य नाही. याउलट या परिवहन मंडळाला कशा पद्धतीने नफ्यात आणता येईल याचा प्रयत्न करून जास्तीत जास्त वेतन कर्मचाऱ्यांना कसे मिळेल याकडे आमचा प्रयत्न आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …