ठळक बातम्या

ममता बॅनर्जी आणि संजय राऊत भेटीत एकीवर चर्चा!

मुंबई – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायची होती; मात्र प्रकृ तीच्या कारणास्तव उद्धव ठाकरे यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत आणि इतर शिवसेना नेत्यांची ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली. या भेटीत काय राजकीय चर्चा झाली, याविषयी प्रश्न विचारले जात आहेत. खासदार संजय राऊत यांनी या भेटीविषयी पत्रकारांच्या प्रश्नांना बुधवारी उत्तरे दिली.
सर्वप्रथम ममता बॅनर्जी यांची शिवसेनेच्या नेत्यांशी भेट ही निश्चितच राजकीय हेतूने होती, हे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींविषयी दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली असून, भविष्यातील रणनीतीदेखील विचारात घेतली गेली, अशी माहिती राऊत यांनी दिली. संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात भाजपचे कार्यकर्ते सीबीआय, एनसीबी, ईडी अशा सरकारी तपास यंत्रणांमार्फत दहशतवाद निर्माण करीत आहेत. अशाच प्रकारचे ‘महान’ कार्य भाजप पश्चिम बंगालमध्येही करीत आहे, अशी माहिती ममता दीदींनी दिली; मात्र तेथे आम्ही त्यांना पुरून उरलो आहोत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रदेखील या दहशतवाद्यांशी सामना करेल, अशी खात्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. २०२४ मधील लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणती रणनीती आखायची यावरही दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली असून, भाजपविरोधात एकत्रपणे लढण्यावर यावेळी एकमत झाले. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या अन्यायाशी, असत्याविरोधात एकत्र लढू, असे आश्वासन ममता बॅनर्जी यांनी दिले असे राऊत यांनी सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …