मनी हाइस्टच्या स्टॉकहोमच्या घरात श्री गणेशाचे पेंटिंग!

संपूर्ण जगभरात गाजलेल्या मनी हाइस्ट या वेब सीरिजमध्ये स्टॉकहोमची भूमिका साकारणाऱ्या इस्तर एस्बोच्या घरात श्री गणेशाचे मोठे पेंटिंग स्पॉट करण्यात आले आहे. सोशल मीडियावर हा फोटो वेगाने व्हायरल होत आहे. इस्तर एस्बो सोशल मीडियावर खूप सक्रिय असून, ती नेहमी आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. आता तिचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यात ती घरात काम करताना दिसून येतेयं. खरेतर या फोटोतील सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की इस्तरच्या मागे श्री गणेशाची प्रतिमा दिसून येतेयं. एका आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवलेल्या अभिनेत्रीच्या घरात श्री गणेशाचे पेंटिंग पाहून चाहते चांगलेच चकीत झाले आहेत.
इस्तर एस्बो ही एक स्पॅनिश कलाकार आहे. ती मनी हाइस्टमध्ये मोनिका गैजतांबाइड ऊर्फ स्टॉकहोमच्या भूमिकेत दिसून येते. मनी हाइस्ट ही वेब सीरिज चांगलीच गाजली. विशेषत: त्यातील व्यक्तिरेखांची खूप चर्चा झाली. आता श्री गणेशाच्या पेंटिंगबरोबरचा स्टॉकहोमचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. एका चाहत्याने सोशल मीडियावर लिहिले आहे,

‘स्पॅनिश अभिनेत्री इस्तर एस्बो जी मनी हाइस्टमध्ये दिसून आलीयं, तिने अतिशय अभिमानाने श्री गणेशाची आपल्या घरात स्थापना केली आहे.’ हा फोटो इस्तर एस्बोच्या इंस्टाग्राम लाइव्ह सेशनमधून घेण्यात आल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …