मनी लॉड्रिंग प्रकरणाशी संबंधित पाच जणांना जामीन


मुंबई- मनी लॉड्रिंग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच चार्टर्ड अकाऊंटना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सत्र न्यायालयाने३ लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांनी मुंबईतील हॉटेल आणि बारमधून १०० कोटी रुपयेवसूल करण्याचेआदेश दिलेअसल्याचा आरोप केला होता. त्यात बडतर्फअधिकारी सचिन वाझेचा समावेश असल्याचेम्हटलं होतं. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या एफआयआरच्या आधारावर ईडीने११ मेरोजी देशमुखांविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. याप्रकरणी देशमुख यांच्यासह पाच सीए विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी चार्टर्ड अकाउंटंट विनोद हसनी आणि विशाल खटवानी आणि सुरेंद्र कुमार जैन, वीरेंद्र कुमार जैन, किशोर दिवाणी यांना न्यायालयात विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर हजर केलेअसता पाचही जणांना प्रत्येकी ३ लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर करत न्यायालयानेत्यांच्या नियमित जामीन याचिकांवर २ डिसेंबर रोजी सुनावणी निश्चित केली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …