मनिका बत्रा विश्व टेबल टेनिसमध्ये इतिहास रचण्यास अपयशी

ह्युस्टन – भारताची स्टार खेळाडू मनिका बत्रा मिश्र व महिला दुहेरी सामन्याच्या क्वार्टर फायनलमध्ये पराभूत होण्यासह विश्व टेबल टेनिस चॅम्पियनशीपमध्ये पदक जिंकण्यास अपयशी राहिली. ऐतिहासिक पदकापासून फक्त एक विजय लांब मनिका व जी. साथियानला मिश्र दुहेरी स्पर्धेत अंतिम आठच्या सामन्यात जपानच्या तोमाकाजु हरिमोतो व हिना हयाताविरुद्ध १-३ (५-११, २-११, ११-७, ९-११) असा पराभव झेलावा लागला. मनिकाकडे इतिहास रचण्यासाठी आणखीन एक संधी होती, पण ती तेथेही अपयशी ठरली. तिला व अर्चना कामतला महिला दुहेरीच्या सामन्यात सरळ सेटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. मनिका व अर्चनाला एकतर्फी सामन्यात साराह डि नुटे व नी शिया लियान या लक्झमबर्ग जोडीविरुद्ध ०-३ (१-११, ६-११, ८-११) असा पराभव मिळाला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …