मनमोहन सिंग यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

प्रकृती स्थिर असल्याची माहिती
नवी दिल्ली – काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती आता स्थिर असून, त्यांना रुग्णालयातून (अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था-एम्स) डिस्चार्ज देण्यात आला आहे. तापाची लक्षणे आणि प्रकृती अस्वस्थ वाटत असल्याने डॉ. मनमोहन सिंग यांना काही दिवसांपूर्वी (१३ ऑक्टोबर) एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नितीश नाईक यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या एका चमूने त्यांच्यावर उपचार केले. मनमोहन सिंग यांना या वर्षी कोरोना विषाणूची लागण झाली होती. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना १९ एप्रिल रोजी एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर २९ एप्रिल रोजी त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. सिंग यांनी ४ मार्च आणि ३ एप्रिल रोजी कोरोना लसीचे दोन डोस घेतले होते. डॉ. मनमोहन सिंग ८९ वर्षांचे आहेत आणि ते मधुमेहाच्या आजारानेही त्रस्त आहेत. त्यांच्यावर दोन बायपास शस्त्रक्रियादेखील करण्यात आल्या आहेत. त्यांची पहिली शस्त्रक्रिया १९९० साली ब्रिटनमध्ये करण्यात आली, तर दुसरी बायपास शस्त्रक्रिया एम्समध्ये २००९ साली करण्यात आली आहे. गेल्या वर्षी औषधाची रिॲक्शन आणि ताप आल्यानंतर मनमोहन सिंग यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. कित्येक दिवसांनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी काही दिवसांपूर्वी डॉ. सिंग यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृ तीची विचारपूस केली होती. त्यादरम्यान काढलेला एक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावरून डॉ. मनमोहन सिंग यांची मुलगी दमन सिंग यांनी मंडाविया यांच्यावर टीका केली होती.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …