मनमाड मर्डर केस : अखेर ‘त्या’ हत्येचा उलगडा; चौघांना बेड्या

मनमाड – ऐन दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी मनमाड रेल्वे स्थानकात एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर फरारी झालेल्या चौघा आरोपींना अटक करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. चारही आरोपींना पोलिसांनी रायगडजवळ नराळे येथून ताब्यात घेतले. त्यानंतर या चारही आरोपींना पोलिसांनी मनमाडला आणले आणि अटक केली.

प्रेम प्रकरण आणि इन्स्टाग्रामवर अश्लील फोटो टाकल्याच्या कारणावरून शिवम पवार आणि आरोपींमध्ये ६ नोव्हेंबरला मनमाड रेल्वे स्थानकावर वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी शिवमवर चाकूने वार करून त्याची निर्घृणपणे हत्या केली. यानंतर आरोपी फरारी झाले होते, तेव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. आरोपी रायगडच्या नराळे या भागात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच, पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि चारही आरोपींना जेरबंद करण्यात आले. चेतन मोधळे, मयूर कराळे, निशांत जमधाडे आणि मोहित सुकेजा, अशी या आरोपींची नावे असून, सर्व कर्जत भागातील आहेत. रेल्वे पोलिसांनी या आरोपींवर भादंवि ३०२चा गुन्हा दाखल केला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …