मध्य रेल्वेकरांसाठी खूशखबर!

  •  नव्या वर्षात धावत्या लोकलमध्ये मिळणार नि:शुल्क वायफाय
  • १६५ लोकलमध्ये वायफाय बसविण्याचे काम सुरू

मुंबई – लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने २ वर्षांपूर्वी धावत्या लोकलमध्ये वायफाय सेवा देण्याची घोषणा केली होती. मात्र, कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून रखडलेला हा प्रकल्प नवीन वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे नव्या वर्षात लोकल प्रवाशांना धावत्या ट्रेनमध्ये नि:शुल्क वायफाय सेवा मिळणार आहे.
एसटी महामंडळाने गेल्या काही वर्षांपूर्वी एका खासगी कंपनीशी करार करून राज्यभरातील १८ हजार एसटी बसेसमध्ये ‘प्री-लोडेड’ वायफाय सुविधा देण्यात आली होती. त्यामुळे धावत्या एसटीत प्रवाशांना इंटरनेट सुविधा मिळत होती. एसटी महामंडळाच्या धरतीवर मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये ही ‘प्री-लोडेड’ इंटरनेट सेवा देण्याची घोषणा २ वर्षांपूर्वी मध्य रेल्वेकडून करण्यात आली होती. मात्र, काही तांत्रिक अडचणी आणि त्यानंतर कोरोनामुळे हा प्रकल्प रखडला होता. मात्र, रेल्वेने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आता कंबर कसली असून, नव्या वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे काम रेल्वेने सुरू केले आहे. एका खासगी कंपनीमार्फत मध्य रेल्वेच्या १६५ लोकलमध्ये ३ हजार ४६५ डब्यांत वायफाय लावण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक डब्यात एक वायफाय लावले जात असून, काम वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. ‘कंटेट ऑफ डिमांड’ अंतर्गत लोकलमध्ये बसवण्यात येणाऱ्या वायफाय सुविधेमध्ये प्री-लोडेड चित्रपट, मालिका आणि गाणी यांचा समावेश असेल. प्रवाशांना केवळ मोबाइल वायफाय सुरू करणे गरजेचे आहे. वायफाय लॉगइन केल्यानंतर प्रवाशांना ‘प्री-लोडेड’ माहिती मोबाइलवर पाहायला मिळेल. यामुळे प्रवाशांच्या इंटरनेट डेटाची देखील बचत होणार आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …