सनी लिओनीचे नाव गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सनी लिओनीचे नुकतेच रिलीज झालेले गाणे ‘मधुबन में राधिका नाचे’वरून चांगलेच वादंग पेटले आहे. या गाण्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, मध्य प्रदेशच्या गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिलेल्या धमकीनंतर म्युझिक लेबल सारेगामाने या गाण्याच्या लिरिक्समध्ये बदल करून सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर नवे गाणे अपलोड करण्यात येईल अशी पोस्ट टाकली आहे.
म्युझिक लेबल सारेगामाने सोशल मीडियावर या गाण्यावरून सुरू असलेल्या वादाबद्दल अधिकृत स्टेटमेंट जारी केले आहे. सारेगामाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, अलीकडेच मिळालेल्या प्रतिक्रिया आणि देशवासीयांच्या भावनांचा आदर करत आम्ही मधुबन में राधिका गाण्याचे नाव आणि लिरिक्स बदलणार आहोत. नवे गीत पुढील तीन दिवसांमध्ये सर्व प्लॅटफॉर्मवर जुन्या गाण्याची जागा घेणार आहे. जेव्हापासून सनी लिओनीचे गाणे रिलीज झाले आहे, तेव्हापासून या गाण्यावर चांगलाच बवाल झाला आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …