ठळक बातम्या

मच्छीमाºयांना समुद्रात दिसला अत्यंत ‘कुरूप’ मासा

कॅलिफोर्नियामध्ये दोन मच्छीमारांनी अशा माशाचे छायाचित्र काढले. जो आतापर्यंत दिसलेला सर्वात मोठा सनफिश असावा, मात्र हा विश्वविक्रम करण्यासाठी हे छायाचित्र पुरेसे नाही. जेव्हा हा मासा पकडून समोर आणला जाईल, तेव्हाच हा विक्रम त्यांच्या नावावर होईल, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. सध्या या माशाचा फोटो व्हायरल होत आहे.
जगात अनेक प्रकारचे प्राणी आहेत. यातील काही लोकांसमोर आहेत, तर अनेक समुद्रात आहेत. वेळोवेळी असे अनेक जीव जगासमोर येतात, ज्यांना पाहिल्यानंतर विश्वास ठेवणे कठीण जाते. अलीकडेच कॅलिफोर्नियातील दोन मच्छीमारांनी एका महाकाय माशाचे छायाचित्र शेअर केले. हा मासा पाहिल्यानंतर लोकांचा यावर विश्वास बसेना. हा मासा जितका मोठा आहे, तितकाच तो कुरूप आहे. या सनफिशला जगातील सर्वात मोठ्या माशाच्या विक्रमासाठी नामांकन मिळाले आहे, पण आता त्याला अडचण येत आहे.

या मोठ्या सनफिशचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा मासा जागतिक विक्रम करू शकतो, मात्र यासाठी माशाचे चित्र पुरेसे नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तो पकडणे आवश्यक आहे. जेव्हा हा मासा पकडला जाईल, तेव्हा त्याचे मोजमाप आणि वजन करून रेकॉर्डसाठी पुढे नेले जाऊ शकते. सध्या हे केवळ चित्राच्या आधारे करता येणार नाही. हा राक्षस मासा त्याच्या आकाराव्यतिरिक्तआणखी एका कारणाने चर्चेत आहे.
या अक्राळविक्राळ माशाचे फोटो व्हायरल होताच लोकांच्या नजरा त्याच्या चेहºयावर गेल्या. हा सनफिश अर्ध्या शार्कसारखा दिसत होता. त्याचा चेहरा खूपच रागीट दिसत होता. लोकांनी त्याला आतापर्यंत पाहिलेला सर्वात कुरूप मासा म्हटले. मिळालेल्या माहितीनुसार, कॅलिफोर्नियातील लागुना बीचवर हा मासा दिसला. जर्मन आणि तिथे मासेमारीसाठी गेलेल्या मॅट व्हिटन नावाच्या माणसाला हा मासा पाण्यात पोहताना दिसला. तो इतका मोठा होता की, पकडता येत नव्हता. यामुळे त्याचा फोटो काढण्यात आला.

मिस्टर जर्मन यांनी सांगितले की, हा सनफिश सुमारे १० फूट लांब आहे. तो खूप कुरूप दिसत होता. कुणीतरी अर्धा खाल्ल्यासारखा वाटत होता. त्याचे शरीरही अतिशय अव्यवस्थित होते. गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार, १९९६ मध्ये जपानमधील चिबा येथे जगातील सर्वात मोठा सनफिश सापडला होता. त्याचे वजन २३०० किलो होते, मात्र यावेळी या दोन मच्छीमारांनी पुरावा म्हणून त्याचा केवळ फोटोच सादर केला आहे. त्यामुळे त्याचा विक्रम होऊ शकत नाही.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …