ठळक बातम्या

…मग आमच्या पोरांनी मराठीत का शिकावे? बच्चू कडूंचा सवाल

मुंबई – अधिकारी, राजकारणी, श्रीमंतांनी आपली पोरं इंग्रजीत शिकवावी, मग आमच्या पोरांनी मराठीत का शिकावे?, असा उद्विग्न सवाल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विचारला आहे. मराठी शाळांचा आणि शिक्षणाचा दर्जा सुधरावण्यासाठी पालकांची, विद्यार्थ्यांची, शिक्षकांची आणि नेत्यांची मानसिकता बदलवण्याची गरज आहे. यासाठी कठोर निर्णय आणि त्याग करावा लागेल, असेही ते म्हणाले.

मुंबईत मराठी शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना राज्यमंत्री बच्चू कडूंनी वास्तवावर बोट ठेवलं असून, समाजव्यवस्थेवर आणि काही सवाल विचारले आहेत. बच्चू कडू म्हणाले की, मराठी पत्रकारांनी किती अग्रलेख मराठीवर लिहिलेत? किती अधिकारी, राजकारण्यांनी आपली पोरं मराठीत शिकवलित. राजकारणी भाषणं करतात मराठीवर बोलतात; मात्र आपली पोरं इंग्रजी शाळेत शिकवतात. ही सत्य परिस्थिती आहे. आता गरीबाच्या पोराला देखील अक्कल आली आहे. श्रीमंतांनी आपली पोरं इंग्रजीत शिकवावं आणि आम्ही का घालावं मराठीत? गरीबांनी देखील त्यांचं अनुकरण करणं सुरू केले आहे. बच्चू कडू म्हणाले की, देशात भ्रम आहे. इंग्रजी शाळेत गेला की, तो हुशार. ब्रिटनमध्ये सगळेच इंग्रजी बोलतात मग काय सगळेच हुशार आहेत का? तिथेही पागलांची भर्ती आहे. हा भ्रम कमी करण्याची गरज आहे. मराठी शाळेला सोन्याची झळाळी जरी लावली, तरी लोकांची मानसिकता ही आहे की, पोरगं इंग्रजी शाळेत शिकलं पाहिजे. मराठी शाळांचा आणि शिक्षणाचा दर्जा सुधरवण्यासाठी पालकांची, विद्यार्थ्यांची, शिक्षकांची आणि नेत्यांची मानसिकता बदलवण्याची गरज आहे. यासाठी कठोर निर्णय आणि त्याग करावा लागेल. हे कुठेच दिसत नाही. नुसते पैसे ओतून नाही चालणार. मोठे नेते, अधिकारी, पत्रकारांनी सुरुवात करावी की, माझा मुलगा मराठीतच शिकणार. शिक्षण मशीन झाली आहे. टॉप शाळा तर मुलगाही टॉप ही प्रवृत्ती चुकीची आहे, असं बच्चू कडू म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …