ठळक बातम्या

मग अझरुद्दीनने सत्य काय? ते सांगावे – सुनील गावस्कर

मुंबई – रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यामधील कथित वादावर भारताचे प्रसिद्ध क्रिकेटपटू लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी भाष्य केले आहे. विराट आणि रोहितमध्ये सुरू असलेल्या कथित वादामध्ये तुम्ही कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नका, असे सुनील गावस्कर यांनी क्रिकेट चाहते आणि पंडितांना आवाहन केले आहे. पुढच्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतून विराट कोहलीला ब्रेक हवा आहे. त्याने त्याबद्दल बीसीसीआयला कळवले आहे, अशी बातमी बाहेर आल्यापासूनच दोघांमधील वादांच्या चर्चांना बळकटी मिळाली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी कोहलीच्या ब्रेक मागण्याच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ब्रेक घेण्यात काहीच चुकीचे नाही, पण वेळ योग्य असली पाहिजे, असे मोहम्मद अझरुद्दीन यांनी म्हटले आहे. अझरने त्याच्या ट्विटमधून भारताच्या या दोन खेळाडूंमध्ये मतभेद असल्याचे संकेत दिले आहेत, पण गावस्करांना हे मत पटलेले नाही. या प्रकरणात लोकांनी लगेच निष्कर्षापर्यंत पोहोचू नये. कोहली आणि रोहितचे संबंध कसे होते? याबद्दल अझरुद्दीनकडे काही आतली माहिती असेल, तर त्याने संपूर्ण सत्य काय आहे ते सर्वांना सांगावे, असे गावस्कर यांनी म्हटले आहे.
दोन्ही खेळाडू जोपर्यंत काही बोलत नाहीत, तोपर्यंत आपण निष्कर्षावर येऊ नये. अझरुद्दीन काही तरी बोलला आहे. त्याच्याकडे काय घडले, त्याची माहिती असेल, तर त्याने समोर येऊन सांगावी, असे गावस्कर म्हणाले. मागच्या आठवड्यात भारताच्या एकदिवसीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आले. त्यानंतर विराट कोहलीने आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून ब्रेक मागितला. तेव्हापासून भारताच्या या दोन्ही आघाडीच्या खेळाडूंमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चा आहेत. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, रोहितची वनडे कर्णधारपदी निवड झाल्यामुळे विराट कोहली नाराज असल्याची निव्वळ अफवा आहे, असे काहीही नाही.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …