ठळक बातम्या

मंजिरी गावडेचे झंझावाती अर्धशतक

ठाणे – मंजिरी गावडेच्या झंझावाती नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन संघाने व्हिक्टरी क्रिकेट क्लबचा ७० धावांनी पराभव करत डॉ. राजेश मढवी स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि दैवज्ञ क्रिकेट क्लब आयोजित अर्जुन मढवी स्मृती महिला टी- २० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. प्रथम फलंदाजी करताना दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनने २० षटकांत ४ बाद १७४ धावा केल्या. या धावसंख्येत एकट्या मंजिरीचा वाटा होता नाबाद ८६ धावांचा. मंजिरीने ६१ चेंडूंत १० चौकरांसह आपली अर्धशतकी खेळी साकारली. दुसऱ्या बाजूने सिमरन शेखने १९ चेंडंूत तीन चौकार आणि एका षटकारासह २७ धावांचे योगदान दिले. सानिका चाळकेने याही सामन्यात आपली जबाबदारी चोख बजावताना २६ धावा केल्या. शार्वी सावेने दोन आणि अलिना खानने एक विकेट मिळवली. उत्तरादाखल व्हिक्टरी क्रिकेट क्लबला २० षटकांत ९ फलंदाजांच्या मोबदल्यात ७० धावांपर्यंत मजल मारता आली. महेक पोकर (१०) आणि गार्गी बांदेकरने ११ चेंडंूत तीन चौकारासह १२ धावा करत लढत देण्याचा प्रयत्न केला. फातिमा जाफर आणि पलक धर्मशीने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या.
उपांत्य फेरीच्या अन्य लढतीत पार्कोफिन क्रिकेट क्लबने घरच्या मैदानावर खेळणाऱ्या स्पोर्टिंग क्लब कमिटी संघाचा सहज पराभव करत अंतिम फेरीत जागा मिळवली. या सामन्यात संथ फलंदाजी, स्वैर गोलंदाजी आणि खराब क्षेत्ररक्षणाचा फटका स्पोर्टिंग क्लब कमिटीला बसला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या स्पोर्टिंग क्लब कमिटीला २० षटकांत ४ बाद १०१ धावांचे आव्हान उभे करता आले. सुरुवातीच्या खेळात स्पोर्टिंग क्लब कमिटीला ८० धावांपर्यंत मजल मारता येईल का अशी शक्यता वर्तवली जात होती, पण शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजांनी आक्रमक खेळ केल्यामुळे त्यांना शतकी धावसंख्या उभारता आली. इशिका चव्हाणने २४ आणि निधी दावडाने २० धावा केल्या. प्रकाशिका नाईक आणि दीक्षा पवारने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. क्षेत्ररक्षणात स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या गोलंदाजांनी पार्कोफीनची सलामीची जोडी झटपट तंबूत पाठवत सामन्यात रंगत निर्माण केली होती, पण स्वैर गोलंदाजी आणि खराब क्षेत्ररक्षणाने त्यांची अंतिम फेरीत खेळण्याची संधी हुकवली. १६ व्या षटकात ५ बाद १०२ धावा करत पार्कोफिन क्रिकेट क्लबने विजय मिळवला. सायली सातघरेच्या नाबाद ३० आणि सेजल राऊतने १७ चेंडंूत पाच चौकार मारत २५ धावा केल्या. जिया मंद्रवाडकर, रोमा तांडेल आणि लक्ष्या लबडेने प्रत्येकी एक विकेट मिळवली.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …