मंगेश देसाईची नवी इनिंग!

रंगभूमी, चित्रपट आणि टीव्ही मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये सशक्त अभिनेता म्हणून मंगेश देसाईने आपले स्थान निर्माण केले आहे, मात्र इतकी वर्षे अभिनय केल्यानंतर मंगेश देसाई आता वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. मंगेशने साहिल मोशन ही निर्मिती संस्था स्थापन केली असून, निर्माता म्हणून मंगेश देसाई पदार्पण करत आहे.

एक अलबेला, खेळ मांडला यांसारखे संवेदनशील चित्रपट, क्राइम पेट्रोलसह विविध मालिकांमध्ये मंगेशने अभिनेता म्हणून आपला ठसा उमटवला आहे. विनोदी अभिनेता म्हणून तर त्याची ओळख आहे. अभिनेता म्हणून असलेल्या ओळखीच्या पलीकडे जाऊन मंगेशने निर्माता म्हणून एक चित्रपट हाती घेतला आहे. अतिशय महत्त्वाकांक्षी असा हा चित्रपट आहे. ठाण्यात या चित्रपटासाठी झालेल्या निवड चाचणीला इतकी गर्दी झाली की, तीन सभागृह घेऊन निवड चाचणीचे आयोजन करावे लागले. मराठी चित्रपटसृष्टीत निर्माता म्हणून पदार्पण करण्यासाठी मंगेशने कोणता विषय निवडला आहे, चित्रपटाचे नाव काय, लेखक, दिग्दर्शक, कलाकार कोण ही सगळीच माहिती अजून गुलदस्त्यात आहे.
चित्रपट निर्मितीविषयी मंगेश म्हणाला की, एवढी वर्षे अभिनय केल्यानंतर काहीतरी वेगळे करून पाहायची इच्छा होती. त्यामुळे आता चित्रपट निर्मितीमध्ये पाऊल टाकले आहे. कारण अभिनया इतकीच चित्रपट निर्मितीही आव्हानात्मक काम आहे. आतापर्यंत विनोदी असो किंवा गंभीर भूमिका, मी माझे काम नेहमीच संवेदनशीलतेने करत आलो. आता तीच संवेदनशीलता निर्माता म्हणून माझ्या पहिल्या निर्मितीतही प्रेक्षकांना दिसेल हा विश्वास आहे. चित्रपटाचे सर्व तपशील योग्यवेळी जाहीर करणार आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …