मंगळवारीही देशात पेट्रोल व डिझेलचे दर जैसे थे

नवी दिल्ली – मागील दोन महिन्यांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला होता. अशात दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेल दरांवरील उत्पादन शुल्क कमी करून सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा दिला होता. चांगली बाब अशी की, तेव्हापासून देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.

शुक्रवारपासून म्हणजेच, ५ नोव्हेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. अशातच, केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात घट केल्यानंतर अनेक राज्यांनीदेखील पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटमध्ये घट केली होती. केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात कपात करण्यात आल्यानंतर आसाम, त्रिपुरा, गोवा, उत्तर प्रदेश, गुजरात, उत्तराखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, मणिपूर आणि कर्नाटक सरकारने पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात घट केली होती. त्यासोबत हरियाणामध्येही व्हॅट कमी करण्याची घोषणा करण्यात आली होती. या सर्व राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. दरम्यान, वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांची सत्ता असलेल्या अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट अद्याप कमी करण्यात आलेला नाही. महाराष्ट्रात मात्र राज्य सरकारने करात कपात केली नाही, त्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणाही साधला. मंगळवारी मुंबईत पेट्रोलची किंमत १०९.९८ रुपये प्रति लिटर आहे, तर डिझेलची किंमत ९४.१४ रुपये प्रति लिटर इतकी होती, तर देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत १०३.९७ रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत ८६.६७ रुपये प्रति लिटर इतकी होती. तसेच चेन्नईमध्ये पेट्रोल १०१.४० रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल ९१.४३ रुपये प्रति लिटर, कोलकातामध्ये डिझेल ८९.७९ रुपये आणि पेट्रोल १०४.६७ रुपयांनी विकलं जात होतं.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …