ठळक बातम्या

भुकेने वेड्या झालेल्या मुलाचे अचंबित करणारे कृत्य झाले व्हायरल

भुकेलेला माणूस किती चिडखोर होतो हे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. भूक लागल्यावर लोक कोणत्याही थराला जातात. माणसाला राग यायला लागतो आणि कधी-कधी तो योग्य-अयोग्य यातील फरक विसरतो. भुकेमुळे एका मुलाला इतका राग आला की बर्गरच्या बदल्यात त्याने वडिलांना घर जाळून टाकण्याची धमकी दिली.
मलेशियातून हे प्रकरण समोर आले आहे. २७ डिसेंबर रोजी मलेशियातील बाटू केव्हजमध्ये राहणाºया २९ वर्षीय अदीबने त्याच्या वडिलांना बर्गर आणण्यास सांगितला, पण यानंतर त्याने जी धमकी दिली, त्यामुळे लोक आश्चर्यचकित झाले, त्याने फोनवर स्पष्टपणे सांगितले की, जर त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी बर्गर आणला नाही तर संपूर्ण घर पेटवून देईल.

मलेशियन मीडिया बेरनामाने दिलेल्या माहितीनुसार, अदीबच्या वडिलांनी त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यानंतर अदीबला २८ डिसेंबरला अटक करण्यात आली. कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान अदीब महिन्याला केवळ १७ हजार रुपये कमावत असल्याचे आढळून आले. अदीबच्या बचाव पक्षाच्या वकिलाने सांगितले की, त्याच्या अशिलाला एका महिन्यात फारच कमी कमाई होत असल्याने त्याला कमी शिक्षा द्यावी.
मात्र, अदीबच्या वडिलांच्या वकिलाने सांगितले की, मुलाने आपल्याच वडिलांना अशी धमकी दिल्याबद्दल त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्याची सदैव आठवण राहील अशा पद्धतीने त्याला शिक्षा झाली पाहिजे. लोकांनी या प्रकरणातून शिकले पाहिजे की, तुमच्या वडिलांचा आदर करा आणि अशा धमक्या देऊ नका. सुनावणीनंतर न्यायदंडाधिकाºयांनी अदीबला पाच महिन्यांची शिक्षा सुनावली. बर्गरची मागणी करणाºयाला ५ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाल्याची बातमी व्हायरल होत आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …