भीमा-कोरेगावचा इतिहास त्यागाचा आणि पराक्रमाचा – अजित पवार

पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी भीमा-कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केले. इतिहासाची पाने बघितली असता, महाराष्ट्राचा आणि त्याचप्रमाणे भीमा-कोरेगाव येथील इतिहास त्यागाचा, शौर्याचा आणि पराक्रमाचा आहे, असे ते यावेळी म्हणाले. यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते.

राज्यातील सर्व जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, महाराष्ट्राला शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास आहे. इतिहासाची पाने पाहिली, तर आपल्याला पुण्यातही हेच दिसते. भीमा-कोरेगाव येथे जे शूरवीर शहीद झाले. त्या सर्वांना अभिवादन करतो. हा इतिहास पुढच्या पिढीलाही स्मरणात राहावा आणि परिसराचा विकास व्हावा यासाठी यंदाच्या अधिवेशनात घोषणा केल्याप्रमाणे शासकीय समिती करण्यात आली आहे. त्यामध्ये अशासकीय सदस्यांचाही समावेश केला जाईल. स्मारकाचा विकास करण्यासाठी जागा संपादित करणे, चांगल्या प्रकारची पार्किंग व्यवस्था आदी सुविधा करण्यास शासनाचे प्राधान्य राहील. उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले, कोरोनाच्या बाबतीत राज्य शासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी नियमांचे भान ठेवले पाहिजे. लग्नसमारंभ आणि अशा प्रकारचे समारंभ मोठ्या स्वरूपात व्हावेत, असे प्रत्येकाला वाटते. परंतु, कोरोनाचा नवीन स्वरूपात आलेल्या विषाणूचा संसर्ग वेगाने होतो, ही बाब लक्षात घेतली पाहिजे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …