ठळक बातम्या

भारत व न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना : वानखेडेत फक्त २५ टक्के प्रेक्षकांनाच परवानगी

मुंबई – भारत व न्यूझीलंड यांच्यात येथे ३ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी दरम्यान वानखेडे स्टेडियममध्ये क्षमतेच्या २५ टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आलेली आहे व आयोजक मुंबई असोसिएशनचे म्हणणे आहे की, आम्ही ही संख्या वाढवण्याचा प्रयत्न करू. वानखेडे स्टेडियममध्ये ३० हजार प्रेक्षकांना बसण्याची क्षमता आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)च्या एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ही मर्यादा वाढवत ५० टक्क्यांनी करण्याचा आमचा प्रयत्न असेल. अधिकारी म्हणाले की, महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांनी दिलेल्या आदेशानुसार आतापर्यंत वानखेडे कसोटीसाठी २५ टक्के प्रेक्षकांना परवानगी दिलेली आहे. एमसीएला अपेक्षा आहे की, ते आम्हाला ५० टक्क्यांपर्यंत परवानगी देऊ शकतात. या स्टेडियममध्ये अखेरची कसोटी इंग्लंडविरुद्ध डिसेंबर २०१६ साली झाली होती. या सामन्याच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होईल, कारण कोविड-१९ महामारीमुळे मागील वर्षी खेळ उपक्रम बंद करण्यात आलेले.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …