भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामना प्रेक्षकांशिवाय?

जोहान्सबर्ग – भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात २६ डिसेंबरपासून सुरू होणारा पहिला कसोटी सामना प्रेक्षकांशिवाय खेळवला जाईल, कारण कोरोना विषाणूचे नवे व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या प्रसारामुळे यजमान क्रिकेट बोर्ड तिकीट विक्री करत नाही आहे. आफ्रिकेतील स्थानी वर्तमानपत्रांनी या आशयाच्या बातम्या छापल्या आहेत. तसेच तेथील एका स्थानिक वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना निर्बंधामुळे सरकारने दोन हजार प्रेक्षकांची परवानगी दिली होती, ज्यामुळे काही खास लोकच स्टेडियममध्ये सामना पाहताना दिसतील. अद्याप ३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीच्या तिकीट विक्रीसाठी काढण्यात आलेल्या नाहीत. स्टेडियमच्या ट्विटर अकाऊंटवर सांगण्यात आले की, भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा दुसरा कसोटी सामन्याच्या तिकीट विक्रीबाबत अद्याप कोणतीच घोषणा झालेली नाही. अद्याप स्पष्ट नाही की, प्रेक्षकांना प्रवेश दिला जाईल की, नाही. वेळ आल्यानंतर त्याबाबत घोषणा केली जाईल. दक्षिण आफ्रिकेत मागील काही दिवसांत ओमिक्रॉनचे असंख्य रुग्ण आढळलेत. त्यामुळे येथील स्थानिक चार दिवसीय फ्रँचायजी मालिका स्थगित करण्यात आल्यात. भारतीय संघ १६ डिसेंबरला येथे दाखल झाला असून, त्यांची व्यवस्था एका रिसॉर्टमध्ये करण्यात आली आहे, जिथे फक्त तेच वास्तव्यास आहेत. मालिकेतील तिसरी कसोटी ११ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवली जाईल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …