भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला डब्ल्यूएचओची मान्यता

नवी दिल्ली – हैदराबाद येथील भारत बायोटेक या लसनिर्मिती करणाऱ्या कंपनीची निर्मिती असलेल्या कोव्हॅक्सिन लसीला आता जागतिक आरोग्य संघटने (डब्ल्यूएचओ)ची मान्यता मिळाली आहे. कोव्हॅक्सिन ही भारताने बनवलेली स्वत:ची कोरोना प्रतिबंधक लस आहे. जवळपास वर्षभरापूर्वीच भारत सरकारच्या औषध महानियंत्रकांनी या लसीच्या भारतातील वापराला परवानगी दिली होती. ही लस भारत बायोटेकसोबत आयसीएमआर आणि राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्थेने एकत्रितरित्या बनवली आहे. दोन दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाने कोव्हॅक्सिन लसीला परवानगी दिली होती. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलिया सरकारचे आभार व्यक्त केले होते. भारत बायोटेकचं संशोधन आणि निर्मिती असलेल्या या लसीला जागतिक आरोग्य संघटेनची परवानगी मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासात येत असलेल्या अडचणी दूर होण्यास मदत होईल. भारतातून अन्य देशांमध्ये जाणाऱ्यांनी कोव्हॅक्सिन लस घेतलेली असेल, तर त्यांना संबंधित देशात गेल्यानंतर विलगीकरण नियमांचे पालन करावे लागत असे. डब्लूएचओची मान्यता मिळाल्यामुळे आता हा द्रविडी प्राणायाम वाचणार आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …