भारत बायोटेकची नॅझल व्हॅक्सिन; तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या मंजुरीसाठी सीडीएससीओची शिफारस

  • बुस्टर डोससाठी होणार वापर

नवी दिल्ली – कोरोनाने पुन्हा एकदा डोकेवर काढले असून, नागरिकांवर निर्बंधांचा मारा सुरू केला आहे. अशात आरोग्य यंत्रणेकडून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यता येत असून, देशातील अनेक राज्यांत कठोर निर्बंध लावण्यात आलेत. कोरोनाच्या लढ्याला बळकटी देण्यासाठी लसीकरणावर पुन्हा एकदा जोर देण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने केंद्रीय औषध नियंत्रण संस्थेच्या (सीडीएससीओ) विषय तज्ज्ञ समितीने भारताच्या ड्रग कंट्रोलर जनरल (डीसीजीआयओ)कडे भारत बायोटेकच्या नेझल व्हॅक्सिनच्या (नाकावाटे देण्यात येणारी लस) तिसऱ्या टप्प्यातील क्लिनीक चाचणीला मान्यता देण्याची शिफारस केली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोरोनाची लस घेतलेल्या लोकांना बुस्टर डोस देण्यासाठी या लसीचा वापर होणार आहे.
कोव्हॅक्सीन आणि कोव्हिशील्ड या लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना बुस्टर डोससाठी बीबीव्ही १५४ नेझल व्हॅक्सीनच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनीक चाचणीला परवानगी देण्यासाठीचा प्रस्ताव भारत बायोटेकने दिला आहे. या प्रस्तावाला सीडीएससीओच्या विषय तज्ज्ञ समितीने डीसीजीआयओच्या या चाचणीला परवानगी दिली आहे. आता या चाचणीला डीसीजीआयओची मंजुरी बाकी आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना भारत बायोटेकने नेझल व्हॅक्सीनचा बुस्टर डोस देण्यासाची परवानगी मागितली होती. नेझल व्हॅक्सीन हे नाकातून दिले जाणारे औषध आहे. ही लस इंजेक्शनऐवजी नाकातून दिली जाईल. भारत बायोटकेने या व्हॅक्सीनच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीचा डेटा सीडीएससीओला दिला होता. त्यानुसार ही लस सुरक्षित आणि रोगप्रतिकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. याच माहितीच्या आधारे विषय तज्ज्ञ समितीने डीसीजीआयकडे या लसीच्या चाचणीला परवानगी देण्याची शिफारस केली होती. भारतात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना बुस्टर डोस देण्याची गरज असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. बुस्टर डोसमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि कोरोनाची लागण झाली, तरी त्याची लक्षणे सौम्य असतील असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे भारत बायोटेकच्या नेझल व्हॅक्सीनची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी यशस्वी झाली, तर दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना बुस्टर डोस म्हणून ही लस देण्यात येईल.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …