ठळक बातम्या

भारत पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर?

मुंबई/नवी दिल्ली – गेल्या वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा संसर्ग जगभरात पसरू लागला आणि बहुतांश देशांनी ‘लॉकडाऊन’ अंमलात आणला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळीही तडाख्यातून वाचण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाऊन लावला होता. आता ओमिक्रॉनच्या रूपाने कोरोनाचा नवा व्हेरिएंट हातपाय पसरू पाहत आहे. कर्नाटकात दोघे ओमिक्रॉनग्रस्त सापडल्यानंतर धाकधुक वाढली आहे. त्यामुळे आता देशात पुन्हा लॉकडाऊन होणार की काय, अशी शंका ‘दुहेरी लसवंतां’च्या मनात उपस्थित झाली आहे.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लागलेल्या लॉकडाऊनची चित्रे आजही अनेकांच्या डोळ्यांसमोर ताजी असतील. घर गाठण्यासाठी शेकडो मैल पायी चालत गेलेले स्थलांतरित मजूर, रिकामे रस्ते, सर्वसामान्य कामे करताना दररोज येणाऱ्या अडचणी या सर्व गोष्टी आजही आठवतात. त्यामुळे अनेक जणांना लॉकडाऊन नको आहे, पण ओमिक्रॉनमुळे भारताला आणखी एक लॉकडाऊन अनुभवायला लागणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
सद्यस्थितीचा विचार करता, सरकार लॉकडाऊन लागू करण्याच्या विचारात नाही. ओमिक्रॉनबाबत भयभीत होण्याची गरज नाही, आणि कोरोनाविरुद्धच्या लढ्यात वापरली जाणारी आपली आयुधे तशीच वापरत राहा, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी गुरुवारी सांगितले. ही आयुधे कोणती, तर फेसमास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशन. याशिवाय कोरोना लसीचे दोन डोस घेणेही गरजेचे आहे. भारताला आणखी लॉकडाऊन परवडणारा नाही, असे अर्थ विषयातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अन्यथा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा धक्का पोहोचण्याची चिन्हे आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …