भारत-पाक युद्धातील माजी सैनिकाची मुलगा, सून, नातवाकडून हत्या

 

नांदेड – काही गोष्टींपुढे सगळी नाती फिकी पडतात. असाच काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर शहरात समोर आला आहे. लहुजी नगर येथे राहणारे माजी सैनिक नारायणराव साबळे (७०) यांना त्यांच्या मोठ्या मुलाने मारहाण केली. यात दगडाचा जबर मार लागल्याने गंभीर जखमी झालेले नारायणराव साबळे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. नारायणराव साबळे यांनी १९६५ आणि १९७१ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला होता.
अर्धापूर शहरातील लहुजी नगरमध्ये ७० वर्षीय माजी सैनिक नारायणराव साबळे हे कुटुंबासह राहतात. भारत-पाक युद्धात त्यांच्या मांडीला एक गोळी लागली होती. यामुळे त्यांना काही प्रमाणात अपंगत्व आले होते. येथे आल्यानंतर त्यांनी आपली मालमत्ता आपल्या दोन्ही मुलांच्या नावे करून टाकली होती. त्यानंतरही मोठा मुलगा विजय हा नेहमी त्यांच्याशी वाद घालून भांडण करीत असे.६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास किरकोळ कारणावरून मोठा मुलगा विजय, त्याची पत्नी व नातवाने नारायण यांच्यासोबत भांडण केले. शिवीगाळ करीत तिघांनी त्यांना लाथाबुक्क्याही घातल्या, तसेच जीवंत मारून टाकू, अशी धमकीही आरोपींनी दिली. आरोपी विजयने त्यांना जोरात दगड मारल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना पत्नी गयाबाई व लहान मुलगा दिलीप यांनी लगेच अर्धापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी दिलीप साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात मारेकरी विजय आणि अन्य दोघांविरुद्ध गुरनं ३०६/२०२१ कलम ३०२, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी सांगितले.
—————–

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …