भारत-न्यूझीलंड सामन्याच्या स्थगितीसाठी कोर्टात याचिका

रांची – भारत-न्यूझीलंड टी-२० क्रिकेट मालिकेअंतर्गत शुक्रवारी येथे होत असलेला दुसरा सामना स्थगित के ला जावा अथवास्टेडियमच्या क्षमतेच्या केवळ निम्म्या प्रेक्षक ांच्या उपस्थितीच सामना खेळवण्याची परवानगी दिली जावी. या मागणीसाठी झारखंड उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली गेली आहे. झारखंड उच्च न्यायालयातील वकील ॲड. धीरज कुमार यांनी झारखंड राज्य क्रिकेट संघाच्या जेएससीए स्टेडियममध्ये न्यूझीलंड आणि भारत यांच्यादरम्यानच्या मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये पूर्ण क्षमतेने प्रेक्षकांना उपस्थिची मुभा देण्याविरोधात उच्च न्यायालयात ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे, सर्व न्यायालयांसह अन्य कार्यालयेदेखील ५० टक्के कर्मचारी क्षमतेसह कामकाज करीत असताना कोणत्या नियमानुसार राज्य सरकारने क्रिकेट स्टेडियमला १०० टक्के क्षमतेसह वापराची मुभा देण्यात आली आहे? असा सवाल ॲड. धीरज कुमार यांनी आपल्या जनहित याचिकेमध्ये केला आहे. याचिके वर लवकरात लवकर सुनावणी घ्यावी आणि राज्य सरकारच्या आदेशाला स्थगिती दिली जावी अशी विनंतीही त्यांनी उच्च न्यायालयाला केली आहे. दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने स्टेडियममधील ५० टक्के आसनेच आरक्षित करण्याची परवानगी दिली होती. मात्र, नंतर हा निर्णय मागे घेण्यात आला आणि आयोजकांना सर्व आसने आरक्षित करण्याची मुभा दिली गेली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …