ठळक बातम्या

भारतीय संघाचा दक्षिण आफ्रि का दौरा साशंक

कानपूर – दक्षिण आफ्रिकेमध्ये दहशत पसरविलेल्या कोविड-१९ च्या नव्या स्वरूपामुळे भारतीय संघाच्या पुढील महिन्यातील त्या देशाच्या दौऱ्याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. भारताच्या सीनियर टीमला १७ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या आपल्या सुमारे सात दिवसांच्या दौऱ्यादरम्यान तीन कसोटी, तीन एक दिवसीय आणि चार टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळावयाचे आहेत. हे सामने जोहान्सबर्ग, सेंच्युरियन, पार्ल आणि केपटाऊन या चार स्थानांवर खेळले जाणार आहेत. देशाच्या उत्तर भागात कोरोनाच्या नव्या स्वरूपाचा फैलाव होत असल्याने जोहान्सबर्ग आणि प्रिटोरिया (सेंच्युरियनजवळ) या शहरांना धोका संभवत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (बीसीसीआय)ने मात्र मालिका निर्धारित वेळापत्रकानुसार होणार असल्याचे म्हटले आहे. सध्याच्या कार्यक्रमानुसार भारतीय टीमला मुंबईतील न्यूझीलंडविरोधातील मालिका संपल्यानंतर ८ किंवा ९ डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना व्हायचे आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …