ठळक बातम्या

भारतीय संघाचा आज मोठा पेपर, नापास झाले तर….

दुबई – पाकिस्तानकडून मिळालेल्या पराभवानंतर न्यूझीलंडविरुद्ध रविवारी टी-२० विश्वचषक सुपर-१२ च्या सामन्यात भारतासाठी एकप्रकारे हा मोठा पेपरच असणार आहे. अशात विराट कोहलीच्या नेतृत्वाची ही येथे सत्वपरीक्षा होणार असून, यात दोन्ही जण नापास झाल्यास भारताच्या सेमिफायनलमध्ये पोहचण्याच्या अपेक्षांना मोठा धक्का बसू शकतो.

मागील रविवारी पाकिस्तानकडून १० विकेटने मिळालेल्या पराभवाला विसरत भारत न्यूझीलंडविरुद्ध आपल्या कामगिरीत सुधारणा करू पाहिल. न्यूझीलंडसारख्या सर्वोत्तम संघाविरुद्ध मात्र हे सोप्पे नाही. टीम साऊदी व ट्रँट बोल्ट खासकरून भारतीय फलंदाजांना नेहमीच अडचणीत आणतात. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन शंभर टक्के फिट नाही व मार्टिन गुप्टीलच्या पायाला दुखापत झाली. डेवोन कॉन्वे दरम्यान अत्यंत आक्रमक व धोकादायक फलंदाज आहे. भारताचे फलंदाज पाकिस्तानविरुद्ध सपशेल फेल ठरले, पण येथे छोटी चूक ही महागात पडू शकते. पूर्णपणे फिट नसतानाही हार्दिक पंड्या व खराब फॉर्मात असलेला भुवनेश्वर कुमार भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरत आहेत. कमरेच्या दुखापतीतून सावरल्यानंतर पंड्या आपल्या फॉर्मात नाही. तो दहापैकी एक सामना खेळत असून निवड समिती व विराट एवढे त्याच्यावर मेहरबान का होतात हा सर्वांना प्रश्न पडतोय. दोघांचेही करिअर दावावर लागले आहे. नेटवर त्यांचे गोलंदाजी सराव करणे हे सिद्ध करते की, तो सध्या दबावात आहे. त्याचा फ्रँचायजी संघ मुंबई इंडियन्स देखील आयपीएल लिलाव पूलात टाकण्याचा प्रयत्न करत आहे. एखाद्यावेळेस भुवनेश्वर कुमारसाठी ही शेवटची आंतरराष्ट्रीय स्पर्धा असू शकते. मागील दोन सत्रात त्याचा वेग खूप मंदावला असून दीपक चाहरसारख्या युवा गोलंदाजांविरुद्ध स्पर्धा करणे त्याच्यासाठी कठीण झाले आहे. भारताने नुकतेच कसोटी फॉरमेटमधील पहिला सामना गमवल्यानंतर शानदार पुनरागमन केलेले. तसेच टी-२० कर्णधाराच्या रूपात विराटची ही अखेरची स्पर्धा असून तोही इतक्या लवकर पराभव पत्कारणार नाही. येथील अपयशाने वनडे व कसोटी फॉमरेटमधील त्याच्या नेतृत्वावर ही प्रश्न उपस्थित होतील. विराट असा खेळाडू आहे, जो प्रतिकूल परिस्थितीत सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. त्याला नेहमीच आव्हान आवडते. अनेक वेळा तो संघाचा संकटमोचक राहिला आहे, पण मागील काही काळापासून कर्णधार विराट व फलंदाज विराट यांच्यातील ताळमेळ पाहण्यास मिळाले नाही. भारतीय संघाचे स्पर्धेच्या अखेरच्या सत्रापर्यंत खेळणे फक्त कोट्यवधी चाहत्यांच्या भावनेशी निगडित नसून स्पर्धेचे व्यावसायिक हित ही त्यात गुंतलेले आहे. आयपीएलच्या स्टार खेळाडूंनी सुसज्ज भारतीय संघ स्पर्धेत टिकतो की, बाहेर पडतो, हे उद्याच्या जय-पराजयावर ठरणार आहे. पाकिस्तानने तिन्ही कठीण सामन्यात विजय नोंदवत ग्रुप दोनमधून जवळपास सेमिफायनल गाठली आहे. त्यांना आता नामिबिया व स्कॉटलंडसोबत खेळायचे आहे. अशात दुसऱ्या स्थानासाठीचा सामना भारत व न्यूझीलंड यांच्यातील आहे, कारण येथे जो जिंकेल तो दुसरे स्थान टिकवेल असे क्रिकेट विश्लेषकांचे मत आहे. येथील दवबिंदू पाहता नाणेफेकीची भूमिका महत्त्वाची असेल. अशात विराट नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेऊ शकतो. तसेच सूर्यकुमार यादव व ऋषभ पंतकडून सर्वोत्तम कामगिरीची चाहत्यांना अपेक्षा असेल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …