ठळक बातम्या

भारतीय वंशाच्या अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ आयएमएफमध्ये उप व्यवस्थापकीय संचालक

वॉशिंग्टन – आंतरराष्ट्रीय नाणे निधी म्हणजे इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (आयएमएफ)च्या फर्स्ट डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर (उप व्यवस्थापकीय संचालक) जियोफ्रे ओकामोटो पुढील वर्षी राजीनामा देणार आहेत. ओकामोटो यांच्या जागी भारतीय वंशाच्या अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांची निवड करण्यात आली आहे. गीता गोपीनाथ २१ जानेवारी २०२२ ला आयएमएफच्या पहिल्या उप व्यवस्थापकीय संचालक या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
गीता गोपीनाथ सध्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. गीता गोपीनाथ यांचे संशोधनात्मक लेख मूर्धन्य इकॉनॉमिक्स जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. आयएमएफमध्ये मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम करण्याआधी गीता गोपीनाथ या हॉवर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागात आंतरराष्ट्रीय अभ्यास आणि अर्थशास्त्राच्या प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. गीता गोपीनाथ यांची ऑक्टोबर २०१८ मध्ये चीफ इकॉनॉमिस्ट म्हणून आयएमएफमध्ये निवड झाली होती. त्या जानेवारी २०२२ मध्ये हॉवर्ड विद्यापीठात पुन्हा काम करण्यासाठी जाणार होत्या. गीता गोपीनाथ यांचा जन्म भारतात झाला आहे. मात्र त्या अमेरिकेच्या नागरिक आहेत.
ओकामोटो जानेवारीमध्ये आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. आयएमफच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ त्यांच्या पदावर काम पाहतील, अशी घोषणा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून गुरुवारी करण्यात आली आहे. आयएमएफने गीता गोपीनाथ यांनी मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून आपल्या कार्यकाळात महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचे सांगितले आहे. पॅनडेमिक पेपरमध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. संपूर्ण जगभरातील कोरोना विषाणू संसर्ग समाप्त करण्यासाठी काय करावे लागेल यासंबंधी त्यांनी मांडणी केली. जगभरात लसीकरण करण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार आयएमएफ, जागतिक बँक आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या नेतृत्वात मल्टिलॅटरल टास्क फोर्स स्थापन करण्यात आला होता. गीता गोपीनाथ यांनी यांनी आयएमएफच्या फर्स्ट डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्ट पदावरील निवडीबाबत आनंद व्यक्त केला आहे. महामारीच्या काळात आयएमफने केलेले काम अतिशय महत्त्वाचे आहे. महत्त्वाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सहकाऱ्यांसोबत काम करण्यास आपण उत्सुक असल्याचे गीता गोपीनाथ यांनी म्हटले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …