भारतीय महिलेने केसांनी खेचली १२ हजार किलो डबल डेकर बस!

जगात अशी अनेक माणसे आहेत जी आपल्या अद्भूत शक्तीने आणि कलाबाजीने मोठे नाव कमावतात, त्याचबरोबर त्यांनी केलेले काम बघून असे वाटते की, ते या जगाचे नसून ते कुठल्यातरी दुनियेतील प्राणी आहेत. अलीकडेच एका भारतीय महिलेने असा पराक्रम केला आहे, ज्यानंतर तिचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. महिलेने १२ हजार किलो वजनाची डबल डेकर बस तिच्या मजबूत केसांनी ओढली आहे.
स्त्रिया किंवा पुरुष, दोघांनाही त्यांचे केस खूप मजबूत असावेत आणि अजिबात तुटू नयेत, असे वाटते. केस तुटण्याच्या समस्येमुळे प्रत्येक जण चिंतेत पडतो, पण भारतातील आशा राणीने असा पराक्रम केला आहे की, ते पाहून लोक तिची स्तुती तर करतीलच, पण तिच्या केसांची मजबुती बघून अनेकांना तिचा हेवा वाटेल.

आशाने १२ हजार २१६ किलो वजनाची डबल डेकर बस केसांनी ओढून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉडर््सच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आशाच्या वेण्यांना दोरीच्या सहाय्याने बसला बांधून ती पूर्ण ताकदीने बस ओढत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. तिला पाहून अजिबात वाटत नाही की, ती बस ओढण्यासाठी कसली तरी धडपड करत आहे. तिने तिच्या केसांच्या साह्याने अगदी विनासायास बस खेचली आहे.
आशाने इटलीतील मिलानमध्ये लो शो डी रेकॉर्ड नावाच्या शोमध्ये लंडनची डबल डेकर बस तिच्या वेण्यांनी खेचली आहे. यानंतर तिला आयर्न क्वीन म्हटले जाऊ लागले. आता आशाने ७ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. ती एक वेट लिफ्टर आहे आणि वेट लिफ्टिंगशी संबंधित तिच्या विशेष कौशल्यामुळे ती हा पराक्रम सहज करू शकली आहे. इंस्टाग्रामवर लोक तिचे कौतुक करताना थकत नाहीत. एकाने सांगितले की, आशाच्या केसांना मजबूत केस म्हणतात. एकाने सांगितले की, तिचेही केस मजबूत आहेत, पण हा पराक्रम केवळ मजबूत केसांचा खेळ नाही. मानवी पायदेखील खूप मजबूत असावे लागतात.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …