भारतीय ‘बेस्ट अंपायर’ची लहानशी चूक किवींना पडली असती महागात!

कानपूर – टीम इंडियाचा पहिला डाव ३४५ धावांवर आटोपल्यानंतर न्यूझीलंडच्या पहिल्या डावाची सुरुवात झाली. टॉम लॅथम आणि विल यंग मैदानात उतरले. या डावातील दुसऱ्या षटकादरम्यान एक अनपेक्षित किस्सा घडला. भारतीय बेस्ट अंपायरकडून चूक झाली असल्याचे निर्दशनास आले. टीम इंडियाकडून इशांत बॉलिंग करीत होता. तेव्हा इशांतचा चेंडू टॉम लॅथमच्या पॅडला लागला. मैदानातील पंच नितीन मेनन यांनी त्याला पायचित दिले. मात्र, चेंडूने आधी बॅटची कड घेतली होती. ही गोष्टी लॅथमला माहिती होती. क्षणाचाही विलंब न घेता लॅथमने रिव्ह्यू घेतला आणि त्याने स्वत:ची विकेट वाचवली. इशांत शर्माच्या गोलंदाजीवर लॅथमने यशस्वी रिव्ह्यू घेतला. पंचांना आपला निर्णय बदलावा लागला. न्यूझीलंडच्या यशस्वी रिव्ह्यूमुळे इशांतच्या विकेटचा शोध कायम राहिला, पण क्रिकेट जगतात ‘बेस्ट अंपायर’ मानले जाणारे नितीन मेनन यांच्याकडून झालेली ही छोटीशी चूक किवींच्या संघासाठी महागात पडली असती.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …