भारतीय खेळाडूंच्या तयारीला जोरदार सुरुवात

सेंच्युरियन – भारतीय क्रिकेट संघ २६ डिसेंबरपासून येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरुवातीच्या कसोटी आधी, येथील वातावरणात सामावून घेण्यासाठी हळूहळू आपल्या सरावाची पातळी वाढवत आहेत. भारतीय संघ मुंबईतील तीन दिवसांच्या कठोर क्वारंटाइनंतर शुक्रवारी सकाळी येथे चार्टर्ड फ्लाइटने दाखल झाले. खेळाडूंना येथे एका रिजॉर्टमध्ये एक दिवसांसाठी वेगळे राहायचे होते, ज्यानंतर त्यांनी आऊटडोर सत्रात भाग घेतला. बीसीसीआयच्यावतीने शनिवारी ट्विट केलेल्या व्हिडीओत संघातील सदस्य ‘फुटवॉली’चा आनंद घेताना दिसत आहेत, ज्यात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचाही समावेश आहे. ही मालिका कोविड-१९ चा आफ्रिकेतील नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा धोका वाढल्यानंतर ही खेळवली जात आहे. या परिस्थितीमुळे भारताच्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले, पण दोन्ही बोर्डांनी दौरा कायम राखण्याबाबत सहमती दर्शवली. भारतीय संघ एका रिजॉर्टमध्ये थांबले असून, हा संपूर्ण रिजॉर्ट फक्त भारतीय संघ व व्यवस्थापनासाठी दक्षिण आफ्रिकेने बुक केला आहे, जेणेकरून ‘बायो-बबल’चे कठोरपणे पालन केले जाऊ शकेल. हे सामान्य फाईव्ह स्टार (पंचतारांकित) हॉटेल नाही, त्यामुळे खेळाडूंना रिजॉर्टमध्ये फिरण्यासाठी खूप जागा उपलब्ध आहे. खेळाडूंना ‘बायो-बबल’मधील अडचणींची माहिती आहे. भारताचे ‘स्ट्रेंथ ॲण्ड कंडिशनिंग’ प्रशिक्षक सोहन देसाई म्हणाले की, आम्ही मुंबईत तीन दिवसांपर्यंत कठोर क्वारंटाइनमध्ये राहिलो व १० तासांच्या मोठ्या फ्लाइटनंतर येथे पोहचलो. शुक्रवारी देखील येथे कठोर क्वारंटाइन होते. त्यामुळे खेळाडूंसाठी कौशल्य सत्र सुरू करणे थोडे जोखिमेचे होते. त्यामुळे ते धावण्यासाठी गेले. थोडे स्ट्रेचिंग केले व घाम गाळला. आम्ही रविवारी एक छोटा सामना खेळू. ते पुढे म्हणाले, सोबतच हा कार्यक्रम अशाप्रकारे आहे की, आम्हाला सुरुवातीपासूनच सराव करत राहावा लागेल. आम्ही फक्त एवढंच बोलू शकतो. येथील समुद्रसपाटीपासूनची उंची १४०० मीटर असून खेळाडूंना या वातावरणात सामावून घेण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागेल. खेळाडूंची ‘फुटवॉली’ बाबत असलेली आवड सांगताना देसाई म्हणाले की, हा खेळ सध्या भारतीय क्रिकेट संघाचा खेळ बोलता येऊ शकतो. आम्ही त्यांना अनेक पर्याय देतो, पण ते ‘फुटवॉली’ निवडतात. त्यांना हा खेळ आवडतो व त्याने यांना आपल्या खेळावर लक्ष देण्यास मदत मिळते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …